पाथरगाव हे नाव डोळ्यासमोर आले की समोर एकच व्यक्तीचा चेहरा दिसतो,ते म्हणजे स्व.बाबुराव संभाजी केदारी त्यांच्याशिवाय पाथरगाव हे अपूर्णच. वास्तविक पाहता इंद्रायणी नदीच्या काठी असलेल्या पाथरगावात संभाजी केदारी आणि सुंदराबाई केदारी यांच्या पोटी चार अपत्ये जन्माला आली .त्यापैकी दोन मुले आणि दोन मुली थोरले माणिक आणि धाकटे बाबुराव असा त्यांचा प्रपंच चालू झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत इंद्रायणीच्या प्रवाहाबरोबर बाबुराव लहानाचे मोठे होऊ लागले, विद्यार्थी दक्षेत कामशेत येथील पंडित नेहरू विद्यालयात त्यांना स्वर्गीय खासदार प्रा.रामकृष्ण मोरे सरांचे मार्गदर्शन लाभले,तेथेच आण्णांना राजकारणांचे बाळकडू मिळाले, अतिशय कष्ट करून त्यांनी आपला प्रपंच नावारूपास आणला होता पुढे त्यांनी उदरनिर्वाहासाठी लोणावळा येथील एबीसी कंपनीत नोकरीला लागले . दरम्यान त्यांचा विवाह नाणेगावातील आंद्रे कुटुंबातील गीताबाई यांच्यांशी झाला.एबीसी कंपनीत त्यांचे नेतृत्व गुण उदयास आले एबीसी कंपनी ही नव्वदीच्या दशकामध्ये महाराष्ट्रातील एक नामवंत कंपनी होती.लोणावळा येथील नगराध्यक्ष श्री. शामराव पाळेकर,टाकवे बु येथील मा.सरपंच तुकाराम असवले,संगिसे येथील मा.सरपंच पांडुरंग ढवळे, खामशेत मधील कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हा. चेअरमन विष्णू गायखे, मळवली येथील ह. भ. प कै.रवींद्र महाराज पंडित,पाथरगावातील मा.पंचायत समिती सदस्य लक्ष्मणराव बालगुडे,पिंपळोली येथील मा.सरपंच विष्णू बोंबले,ताजेचे प्रगतीशील शेतकरी नरहरी केदारी (कारभारी) ,काळुराम केदारी पाटील या सर्वांच्या सहवासातून हे अण्णांचे बहुआयामी नेतृत्व फुलले . त्यातूनच पुढे ते ताजे, पिंपळोली आणि पाथरगाव त्यातूनच पुढे त्यांनी ताजे, पिंपळेाली अन् पाथरगाव या तीन गावच्या ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून नेतृत्व केले . करंजूबाई देवी अन् ग्रामदैवत दत्तात्रय महाराज मंदिर ही त्यांची ग्रामदैवत या दोन्ही मंदिराचे काम हे चांगल्या प्रकारे व्हावे ही त्यांची संकल्पना त्यांनी सत्यात उतरवली ही दोन्ही मंदिरे आज मोठ्या दिमाखात आहे उभी आहे .गावातील प्रत्येक माणूस हा माझ्याच कुटुंबातील आहे अशी भावना मनोमन बाळगणारे अण्णा हे नेहमीच आपल्या सर्वांच्या मनात घर करून राहतील यात तिळमात्र शंकाच नाही. गावातील कोणत्याही कुटुंबाला कोणतीही जरी समस्या जरी उद्भवली तरी अण्णा स्वतः ती सोडवण्यासाठी हजर राहत यांचा अनुभव केवळ पाथरगावच नाही तर पंचक्रोशीतील प्रत्येक माणूस सांगितल्याशिवाय राहणार नाही,गावातील प्रत्येक घराला पाणी ,रस्ता वीज, गावातील मुलांना चांगले शिक्षण, गावातील गरजू व्यक्तींना रोजगार मिळवून देणे ही त्यांची महत्वकांक्षा होती.त्यांच्या या स्वभावामुळे अल्पावधीतच संपूर्ण मावळ तालुक्यात ते प्रचंड लोकप्रिय झाले ते समाजकारण करत असताना . आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचार डोळ्यासमोर ठेवून व स्वर्गीय आमदार रघुनाथदादा सातकर व स्वर्गीय दिलीपशेठ टाटिया यांना गुरूस्थानी मानून,मावळ तालुक्याचे भाग्यविधाते मा.मंत्री मदनशेठ बाफना,आदरणीय शिक्षणमहर्षी कृष्णराव भेगडे , सहकारमहर्षी माऊली दाभाडे.तसेच मावळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या समवेत दीर्घकालीन राजकारण केले .आपल्या छोट्याश्या गावाचे नाव त्यांनी जिल्हा पातळीवर नेले ते काही काळ पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले राजकारणा सोबतच त्यांना व्याही सरपंच विष्णू बोंबले यांच्या सहवासामुळे बैलगाडा शर्यतीचा देखील छंद होता ज्यावेळी बैलगाडा शर्यती चालू होत्या . त्यावेळी प्रत्येक घाटामध्ये त्यांची हजेरी ठरलेली असायची त्यांच्यासोबत पिंपळोली,कांब्रे,खामशेत ताजे येथील ग्रामस्थ बहुसंख्येने असायचे,त्यांना कुस्ती ची सुद्धा खूप आवड होती त्यांचा एक पुतण्या पैलवान शशिकांत केदारी याला त्यांनी मावळ केसरी बनवले तसेच त्यांच्या मुळे पाथरगावात अनेक नावाजलेले पैलवान गावात यायचे. यांना अध्यात्म ची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आवड होती महाराष्ट्रतील अनेक नामवंत कीर्तनकार,प्रवचनकार यांचा अण्णांच्या घरी मुक्काम ठरलेला असायचा पाथरगाव येथील अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे पंचक्रोशीतील भाविक भक्तासाठी एक पर्वणीच असायची या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आण्णा पाहायचे .
समाजकार्य करत असताना त्यांनी व्यवसायात देखील गरुडझेप घेतली व आपल्या मुलांना अन् पुतणे यांना अमोल बाबुराव केदारी,अविनाश बाबुराव केदारी व पुतणे चंद्रकांत माणिक केदारी पैलवान सचिन केदारी यांना विकासाचा राजमार्ग दाखवला हे करत असताना, सर्व मुलांची – पुतण्याची लग्ने देखील मावळ तालुक्यातील नावाजलेल्या बोंबले,पवार,शेळके,गोपाळे,भोंडवे, मावकर,बांदल,राक्षे कुटुंबात लावून दिली, त्यासोबतच त्यांनी वडीवळे येथून लिफ्ट करून पाणी पाथरगाव येथे आणून एक प्रगतशील शेतकरी असल्याचे दाखवून दिले .वाढत्या वयोमानानुसार त्यांनी राजकारणातील वावर कमी केला पण प्रभाव मात्र कायम होता. गावात नवीन नेतृत्व घडविण्याचे काम केले,त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या पैकी त्यांचा मुलगा अमोल बाबुराव केदारी हे देखील उपसरपंच म्हणून काम केले,त्यांच्या पाठोपाठ प्रथम महीला सरपंच म्हणून त्यांच्या सुनबाई सौ.शोभाताई शशिकांत केदारी यांनी देखील यशस्वीरित्या सरपंचपद भुषविले.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ,आमदार फंडातुन चांगली विकास कामे केली.उतारवयात त्यांना बरेच दिवस आजारपणामुळे ते ग्रासलेले होते अशातच दि.७।५।२०२१ रोजी अल्पश्या आजाराचे निमित्त होऊन आण्णा आपल्या सर्वांना सोडून गेले.
अण्णांच्या बाबतीत बोलायचे म्हटले तर, सत्यगुरू राये कृपा मज केली । परी नाही घडली सेवा काही ।। ( शब्दांकन- संदीप मालपोटे, फळणे)

error: Content is protected !!