माझा गाव, माझा अभिमान मावळ तालुक्यातील एका गावची माहिती आज आपण पाहणार आहोत ते गाव म्हणजे फळणे. मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावरून कान्हे फाटा येथील रेल्वे गेट पासुन नऊ किलोमीटर वर डोंगराच्या पायथ्याला हे गाव आहे. गावच्या पायथ्याला आंध्रा धरणाचे बॅकवॉटर आहे .पूर्वी या गावाला पाण्याची खूप टंचाई होती पण १९९० साली मंगरुळ येथे आंध्रा धरण झाले अन् गावातील पाण्याचा दुष्काळच हटला.गावातील बहुतांश सुपीक जमीन ही धरण बांधण्यासाठी संपादित करण्यात आली,तसे पाहिले तर फळणे गाव हे जेमतेम १२० घरांचे गाव कान्हे फाटा येथून अंदर मावळात प्रवेश केल्यानंतर पहिले गाव टाकवे येते , टाकवे हे अंदर मावळातील प्रमुख बाजारपेठ असलेले गाव आहे त्यानंतर रस्त्यावर असलेले गाव म्हणजे फळने गावात प्रवेश केल्यानंतर आपले मन आकर्षित करते ते विठ्ठल - रुक्मिणी मंदिर हे मंदिर अतिशय सुंदर आहे .गावातील बहुसंख्य लोक शेती व्यवसाय करतात पूर्वी गावातील शेती ही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून होती पण जसे आंध्रा धरण झाले तसे येथील ३०ते ३५लोकांनी धरणातून लिफ्ट करून दिड ते दोन किलोमीटवर पाणी आणले आहे व आपला शेती व्यवसाय नावारूपाला आणला आहे ,शेतीसोबतच येथील लोकांचा दुग्धव्यवसाय हा जोडधंदा गेली पन्नास वर्षांपासून होत आहे या गावातून आजदेखील बाराशे लिटर दूध पुणे , पिंपरी चिंचवड,तळेगाव याठिकाणी विक्रीसाठी जात आहे . जसजसा काळ बदलला त्याप्रमाणे गावच्या लोकांनी देखील आपल्या जीवनपद्धतीत काळानुसार केला.गावातील बहुसंख्य युवकांनी चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन हे युवक टाकवे बू|| तळेगाव एमआयडीसी येथे चांगल्या हुद्द्यावर काम करत आहे .काही युवक सरकारी हुद्द्यावर काम करत आहे .आज या गावामध्ये सहकारमहर्षी माऊलीभाऊ दाभाडे यांच्या**गाव तिथं पोल्ट्री यांच्या संकल्पनेच्या माध्यमातून सुमारे पंचवीस पोल्ट्री व्यावसायिक सक्षम होत आहेत,आंध्रा धरणालगत भविष्यात कृषी पर्यटन व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.
गावची शेतजमीन ही जास्त सुपीक नाही परंतु फळबागेसाठी ही जमीन उपयुक्त आहे येथील शेतजमिनीत हापूस व केशर आंबा तसेच चिकू, पेरू ही फळपिके चांगल्या दर्जाची तयार होतात,आज या आमच्या फळणे गावाला मावळ तालुक्यात राजकीदृष्ट्या खूप महत्वाचे स्थान आहे ,संपूर्ण गाव हे पुणे जिल्ह्याचे सुपुत्र अन् देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांना पाठिंबा देणारे गाव आहे ,या गावामध्ये होणाऱ्या निवडणुका या अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडतात कुठल्याही प्रकारचा हेवादेवा पाहायला मिळत नाही.या गावची ग्रूप ग्रामपंचायत ही टाकवे बू|| फळणे अन् बेलज ही तीन गावे मिळून आहे तरीदेखील या गावाने आपले वेगळेपण जपत संपूर्ण मावळ तालुक्यात आपला ठसा उमटवला आहे.या गावचे वेगळेपण असे आहे की , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष,संभाजी ब्रिगेड या सर्व पक्षांचे , संघटनांचे जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष या गावात आहे आणि हे सर्वजण जरी वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी असून देखील गावच्या सर्वागीण विकासासाठी झटत असतात याचा प्रत्यय वेळोवेळी सर्वांना येत असतो या गावचे अजून एक वैशिष्ट्य असे आहे की या गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चौथपर्यंत शाळा असून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना टाकवे येथे जावे लागते दरवर्षी टाकवे येथील हायस्कूलच्या वार्षिक परीक्षेत पाचवी ते दहावी पर्यंतच्या पहिल्या तीन क्रमांकामध्ये फळणे येथील विद्यार्थ्याची संख्या लक्षणीय असते.
*तळेगाव नगरीचे मा.नगराध्यक्ष स्वर्गीय पै सचिनभाऊ शेळके यांनी देखील गावच्या विकासात मोलाची भर घातली त्यांनी देखील या गावातील बहुसंख्य युवकांना अनेक उद्योग व्यवसाय करण्यासाठी आवश्यक मदत केली त्यामुळे आज गावातील युवकवर्ग मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय करताना आपण पाहत आहोत.गावातील प्रत्येक कुटुंबाची प्रगती झाली पाहिजे हे सचिनभाऊंचे स्वप्न होते . मावळ तालुक्यातील राजकीय पटलावर काम करणाऱ्या सर्व राजकीय नेत्यांचे आवडते गाव म्हणजे अंदर मावळातील फळणे या राजकीय नेत्यांमध्ये माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी राज्यमंत्री मदनजी बाफना साहेब,सहकारमहर्षी माऊली भाऊ दाभाडे , स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेशभाऊ साळवे,मावळ तालुका राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे तसेच मावळचे लाडके लोकप्रिय आमदार सुनील आण्णा शेळके या सर्वांना हवेहवेसे वाटणारे आमचे गाव फळणे.पण आमचे गाव हे राजकीय दृष्ट्या वंचित राहिलेले आहे ,१९९९ ला राष्ट्रवादी काँगेस पक्षाची स्थापना झाल्यापासून प्रत्येक निवडणुकीत आदरणीय पवार साहेबांच्या उमेदवाराला बहुसंख्य मताधिक्य देणारे गाव म्हणून संपूर्ण मावळ तालुक्यात प्रसिद्ध आहे याची खात्री आपण मावळ तालुक्यातील पक्षश्रेष्ठींना विचारून माहिती घेऊ शकता.गेली २२ वर्षे गावाला लोकनियुक्त राजकीय पदाचा लाभ झालेला नाही कारण कोणत्याच निवडणुकीत तालुका पातळीवर होणाऱ्या निवडणुकीमध्ये गावच्या उमेदवाराला संधी देण्यात आली नाही यामधे जिल्हा परिषद, पंचायत समिती,कृषी उत्पन्न बाजार समिती यांसारख्या निवडणुकीचा समावेश होतो.तरी भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये फळणे गावाला येणारया जिल्हा परिषद ,पंचायत समिती यांसारख्या निवणुकीसाठी प्रतिनिधीत्व करण्याची संधी मावळ तालुक्यातील जेष्ठ-श्रेष्ठ नेतृत्वाने तसेच मावळचे लाडके लोकप्रिय आमदार सुनील आण्णा शेळके यांनी देखील द्यावी या संधीचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे आणि पुन्हा एकदा विनंती करतो की अंदर मावळचे नेतृत्व करण्याची फक्त एकदा संधी फळणे गावाला द्यावी. (शब्दांकन- संदीप मालपोटे,पोल्ट्री व्यावसायिक)

error: Content is protected !!