वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयात अभूतपूर्व यश मिळवले आहे.
लिफ फाॅर वर्ड (Leaf For Word) संस्थेमार्फत सन २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाईन वर्ड पाॅवर चॅम्पियनशिप काॅन्टेस्ट स्पर्धेत १०हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
त्यात सेमी फायनल राऊंड मधील ३५०० विद्यार्थ्यांमधून ६० विद्यार्थी राज्य स्तरीय अंतिम फेरीसाठी पात्र झालेले होते. त्या स्पर्धेच्या अंतिम निकालमध्ये मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभूळगाव ची वैष्णवी तुकाराम खिल्लारे तिसरी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी राज्यात पहिली आली आहे.
वर्गशिक्षक कविता जोशीने तिला मार्गदर्शन केले. साते शाळेतील माधवी प्रदीप आगळमेचा तृतीय क्रमांक आला,ती इयत्ता तिसरीत शिकते,वर्गशिक्षक शमा शेख आहे.कुंडमळा जिल्हा परिषद शाळेतील रिहान सय्यदने
तृतीय क्रमांक पटकावला तो इयत्ता-चौथी शिकतो, वर्गशिक्षक प्रतिभा जगताप आहे.
मोहितेवाडीतील समीक्षा दत्ता निम्हणने तृतीय क्रमांक मिळवला,ती इयत्ता-पाचवीला आहे.श्वेता गिरी वर्गशिक्षक आहे.

error: Content is protected !!