
रुग्णसेवेचे व्रत घेतलेले डॉ. विकेश मुथा मावळातील सर्वसामान्यांना आपला आधारवड वाटत आहे. मोठया हॉस्पिटल मध्ये,सरकारी दवाखान्यात रुग्णाला अॅडमिट करून घेण्यास टाळाटाळ केली. अथवा मोठ्या रूग्णालयात डाॅक्टरने फोन उचला नाही. तर शेवटाचा आधार म्हणून अनेक कार्यकर्ते डाॅ.विकेश मुथाना फोन करून आमच्या पेशंटवर उपचार करा अशी विनंती करतात.
त्यावेळेस सेवाभावी असणारे डाॅक्टर मुथा क्षणांचा ही विलंब न लावता डाॅ.मुथा रिस्क घेऊन रूग्णांवर उपचार करीत आहेत. मागील वर्षी.आणि याही वर्षी असा अनुभव आलेले अनेक जण आहेत. त्यांना मुथा सर आपले आधार वाटला आहे. समाजात जीवनात काम करताना,संघर्ष कोणाला चुकला.
टिका टिप्पणी,आरोपांची खैरात अनेकांच्या वाटायला आली,पण हे आरोप झेलतच अनेकांनी यशाची शिखरे गाठली,हे दृढसत्य विसरता येणार नाही. असो,सेवाभावी ही विरूदावली मिळवलेले डाॅ.मुथा कोरोना काळात रूग्णांची करीत असलेली सेवा वाखणया सारखी आहे.
प्रचंड इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन यातून त्यांनी त्यांच्याकडे आत्ता पर्यंत हॉस्पिटलमध्ये आलेल्या ५२६ कोरोनाबाधित पैकी ५०४ रुग्णांना कोरोना मुक्त केले. सध्या हॉस्पिटलमध्ये २२ कोरोना रुग्ण उपचार घेत आहे.
दवाखान्यात कोरोना बाधीत अॅडमिट झाला की,त्याची प्रकृती कशी साथ देईल हे देवालाही माहित नसते,पण इच्छाशक्तीच्या जोरावर या रुग्णाला बरे करायचे आहे,ही सकारात्मक घेऊन डाॅक्टर आणि कर्मचारी मैदानात उतरतात.
रात्री ऑक्सिजन सिलेंडर संपणार आहे आणि माझ्या रुग्णांना त्याचा जास्त त्रास होऊ शकतो. मग ते आँक्सीजन सिलेंडरचे नियोजन असो की,रेमडीसीव्हरच,प्लाझ्मा असो की रूग्णांच्या दोन वेळेच्या सकस न्याहारीचे याचे बारकाईने नियोजन मुथा सर करीत असल्याचे येथे उपचार करून बरे वाटलेला रूग्ण सांगत होता.
मला रुग्णाचा जीव वाचवायचा आहे, या भावनेतून.रात्री अपरात्री ऑक्सिजन सिलेंडरची सोय करणारे डॉक्टर रुग्णांच्यानातेवाईकांनी जवळून पाहिले. रुग्णांची आपुलकीने चौकशी काळजी घेणारे हळवे मुथा ज्यांनी अनुभवले त्यांनाच माहित. हॉस्पिटल स्टाफ, कोरोना
रुग्णांना सकाळी हळदीचे दूध, काढा, पौष्टिक आहार आणि योग प्राणायाम यांच्यासह त्यांच्यात
सात्विक ऊर्जा निर्माण करण्यासाठी हे हॉस्पिटल प्रशासन कायम तत्पर असते. त्यामुळे त्यांची आणि
हॉस्पिटलची नाळ कधी जुळली हे त्यांनाच कळले नाही.
दवाखान्यात उपचार घेणा-या प्रत्येक रुग्णांची अस्थेने चौकशी आणि विचारपूस करणारे विरळ डाॅक्टर आहे,त्यात मुथांचा नंबर वरचा असेल.
ज्यांनी उपचारासाठी बिल दिले नाही,अशांचे उपचार कधी थकले आहे,अस कधी जाणवलं नाही. सर्वाना मदत करणारे मुथा सर यांच्या कामाला शुभेच्छा देणारे कित्येक सहकारी पाहिले आहे. अपवादात्मक एखादी दुसरी तक्रार होते ती ही होऊ नये इतकीच अपेक्षा.
