वडगाव मावळ :
निगडे मावळ तालुक्यातील पश्चिम भागातील आंद्रा धरणाच्या जवळचं खेडेगाव. लवकरच जगाच्या नकाशावर झळकेल. तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक चार या गावात ही होणार आहे. कधीकाळी या गावातील ओसाड माळावर गवत उगवायचे. त्या माळावर हिरवीगार शेती बहरली आहे.
माळरानावरील हेच गवत कापून तळेगावच्या गवत बाजारात गवत विकून गावकरी आपला प्रपंच हाकायचे. आता मात्र या ओसाड माळरानावर हिरवीगार शेती बहरली आहे, ही किमया साधली आहे, सामुहिक शेतीसाठी घेतलेल्या पाणी पुरवठा योजनेने.
या माळावर लावलेला ऊस संत तुकाराम साखर कारखान्यात आणला जातो. येथेच पिकलेला कांदा, बटाटा, भाजीपाला शहराच्या बाजारपेठेत विकला जातो. ओसाड माळरानावर बहरलेली हिरवीगार शेती पाहून मनही भरून येते.
हा बदल झाला सामुहिक विचारातून निगडे गावाचे माजी उपसरपंच भिकाजी भागवत, देविदास भांगरे, चंद्रकांत करपे, धोंडीबा भागवत, भास्कर पुंडले, संतोष भागवत, बाळासाहेब भागवत, निलेश भागवत, नथु भागवत, चंद्रकांत भागवत, सुभाष भागवत, शिवाजी खुरसुले, व इतर शेतकरी मंडळींनी सकारात्मक विचार केला.
आणि सामूहिक पाणी पुरवठा योजना राबवली.
त्यातच जोरावर या शेतक-यांच्या वावरात मोठ्या प्रमाणावर ऊस, ज्वारी, बाजरी, भुईमुग, गहू, हरभरा, कांदा, बटाटा, टोमॕटो व इतर तरकारी पिकत आहे,आणि पिकलेले बाजारात विकले जात आहे. पाच वर्षापूर्वी माजी उपसरपंच भिकाजी भागवत यांच्या पुढाकाराने येथील ३१ शेतकऱ्यांनी गट स्थापन करून आंद्रा धरणातून सामूहिक पाणीपुरवठा योजना सुरू केली आहे.
सामूहिक योजनेने शेतकऱ्यांचा अधिक फायदा झाला,वेळ,श्रम आणि पैशाची बचत झाली.
सुमारे २०० एकर कोरडवाहू क्षेत्र ओलिताखाली आले. आंद्रा धरण गावापासून सुमारे ३ कि.मी. अंतरावर असूनही धरणातीलपाण्याचा उपयोग शेतीसाठी होत नव्हता. या सामुहिक पाणी पुरवठा योजनेसाठी ३ कि.मी..जलवाहिन्यांसाठी अधिक खर्च होत असल्याने शेतकरी पाणी योजनाकरण्यासाठी तयार होत नव्हते.
माजी उपसरपंच भिकाजी भागवत यांनी जलवाहिनीच्या कामात पुढाकार घेतला.
शासकीय परवानगी मिळवल्या,३१ शेतक-यांनी एकत्रित येऊन आंद्रा प्रकल्पातून पाणीयोजना केली. या प्रकल्पातून टाकलेल्या जलवाहिन्या.पाच सहा शेतकरी गटाची स्थापना केली.परवानगी घेऊन विद्युत मोटारी टाकल्या,पाईपलाईन साठी जेसीबीने खोदाई केली .
बघता बघता पाईपलाईन पूर्ण झाली,शिवारात पाणी खळलले. कुटुंबातील प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले. आर्थिक परिस्थिती बदलली.
वावरात हिरवीगार शेती बहरली ना बहरली तोच शासनाचा एमआयडीसीचा फतवा आला. संपादनासाठी मोजणी झाल्या,शासन आणि कृती समिती यांच्या बैठका झाल्या. तोच कोरोनाचे सावट आले. शासनस्तरावरून ही कारवाई जेव्हा होईल तेव्हा होईल. आज तरी ज्या माळावर फक्त गवत उगवायचे त्या माळरानावर हिरवीगार शेती पाहून समाधान वाटत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.


.

error: Content is protected !!