वडगाव मावळ:
नाचणी ज्वारी बाजरी किंवा तांदळाच्या भाकरी सोबत गावरान कोंबडी,बक-याच्या मटणाचा फक्कड बेत असल्यावर तृप्तीचे ढेकर येणारच. पै पाहुण्यांना आग्रहाने बोलून मावळातील घरोघरी हा बेत असायचा. यात्राजत्रेला, लग्नात जावळाला, वरातीला आणि देवकाला हा बेत असल्याशिवाय शुभ कार्य झाले असं वाटतच नसायचे.
मटणाचा रस्सा खाल्ल्यावर कसलीही डोकेदु:खी,सर्दी अन अंगदुखी पळून जायची. मावळातील घरोघरी माजघरात मटणाचा टोप शिजाययचाच,खळयावर धान्याची रास लागली की,ती भरून आणण्यापूर्वी तेथेचे बकरे सोलून बत्ताभर मटणाचा रस्सा शिजायचाचा, काळ बदला आणि जुन्या चालीरीतीही बदलल्या.
हाॅटेल,ढाबे आणि खानावळीत मटणाच्या पार्ट्या होऊ लागल्या.खवय्यांची वाढती पंसती पाहून वडगाव मावळ येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हाॅटेल व्यवसायात उतरून करिअर करायचे स्वप्न बघितले,आणि हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. आपले हाॅटेल ब्रॅण्ड असला पाहिजे ही मनातील कल्पना या तरूणाने प्रत्यक्षात उतरवली.
मावळ तालुक्यातील हे एकमेव हाॅटेल आहे,जे आयएसओ नामांकन प्रामाणित आहे.
जिथे खवय्यांसाठी मेजवानी असते,तिथे व्हेज नॉनव्हेज खाल्ल की तृप्तीचे ढेकर येतात. हा तरूण या व्यवसायात येऊ पाहणा-या महाराष्ट्रातील तरुणांसाठी आयडाॅल आहे. वडगाव मावळ येथील अतूल वायकर असे या तरूणाचे नाव,असून हाॅटेल शिवराज हे खाद्यसंस्कृतीतील ब्रॅण्ड झालेले पुणे जिल्ह्यातील मोठे नाव आहे. या हाॅटेल मधील गावरान चिकन,कडकनाथ चिकन,तंदूर,फिशथाळी,व्हेज थाळी,साऊथ इंडियन,चायनीजची चव चाखायला शेकडो ग्राहकांची रीघ लागलेली असते.
येथील पैलवान,सरकार, कडकनाथ बकासूर,मालवणी फिश थाळी, रावणथाळीने महाराष्ट्र भर दबदबा केला आहे,शिवराज मधील गावरान चिकन आणि कडकनाथची चव थेट बाॅलीवूड पर्यत पोहचली. सुपरस्टार नाना पाटेकर यांनी येथील गावरान चिकनच्या रस्सावर ताव मारला. बाॅलीवूड मध्ये पोहोचण्यापूर्वी येथील गावरान मटणाचा ठसका महाराष्ट्रातील कुस्त्याच्या आखाडयात पोहचला.
त्यामुळेच महाराष्ट्र केसरी बाळा रफीक शेख याने येथील सरकार थाळीवर ताव मारला आहे. आज महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणा-या शिवराज ब्रॅण्डचे सर्वेसर्वा अतूल वायकर,वडगाव मावळ येथील शेतकरी कुटूंबातील तरूण,घरच्या शेती मुळे अन्नधान्याची किंमत आणि महत्व ते जाणून आहेत,शेतकरी आई वडील असलेल्या अतूल यांनी हाॅटेल व्यवसायातील करिअरचे स्वप्न महाविद्यालयात पाहिले,खादी ग्रामोद्योग मधून सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी कर्ज या योजनेतून पन्नास हजाराचे कर्ज घेऊन गावरान चिकनचे पाहिले हाॅटेल सुरू केले.
ग्राहकांची पसंती पाहता,ही जागा कमी पडू लागल्याने नायगाव जवळ पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हे हाॅटेलचे स्थानांतरीत केले.शिवराजने पहिली पैलवान थाळी आणली,खवय्यांसाठी पर्वणी दिली,या थाळीला मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहता पैलवान थाळी पाठोपाठ सरकार थाळी,कडकनाथ बकासूर थाळी,मालवणी थाळी, रावण थाळी,बुलेट थाळी लाॅच केल्या आणि सगळ्या थाळयांना राज्यभर प्रसिद्ध मिळाली शिवाय ग्राहकांची भरघोस प्रतिसाद मिळाला.
आज जिथे शिवराज हाॅटेल सुरू आहे.
त्या चौकात एक दोन किराणा दूकाने,एक मटणाचे दुकान दिसयाचे,येथे फारशी वर्दळ नव्हती.या चौकातून नागरिक जात येत होते,तोच चौक आज ग्राहकांच्या गर्दीने गजबजून गेला आहे. या चौकात आज अनेक लहानमोठ्या बैठका होत आहे.ध्येयाने पेटलेला तरूण आपला स्वतःचा व्यवसाय वाढवून पैसा,प्रतिष्ठा मिळवू शकतो,पण आपल्या कल्पकतेने गावातील चौकाचा चेहरामोहराच बदलून टाकू शकतो याचे,एकमेव उदाहरण म्हणजे अतूल वायकर.
अतूल यांनी या व्यवसायावर निष्ठा ठेवली,प्रामाणिकपणे कष्ट केले,सोबतच्या सहका-यांना,कामगारांना बरोबरीचा दर्जा दिला,त्यांचा आदर ठेवला,मानसन्मान ठेवला परिणामी व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती वाढत गेली.
अतुलने अपयश पाहिले,चढउतार पाहिला, पण तो खचला नाही,त्याच्या पाठीशी दाजी विलासशेठ काळोखे आणि मोठा भाऊ श्रीकांत वायकर खंबीर पणे उभे राहिले हे दोघे त्याच्या गुरुस्थानी आहे. अतूलला या व्यवसायात खंबीर पणे साथ देणारी अजून दोन नावे आहेत,पहिले नाव बंडोपत निकम ज्यांनी अतूल पाठिंबा दिला.
आणि दुसरे नाव आहे अतूलची पत्नी पूनम ज्यांनी अतुलच्या यशात आपले यश मानले,अतूलच्या पाठीशी त्या उभ्या राहिल्या. २९ वर्षाचा अतूल महाराष्ट्रातील तरुणांसाठी आयडाॅल आहे,त्याने चाळीस जणांना रोजगार उपलब्ध करून दिला,राज्यातील लाखो ग्राहकाच्या आयुष्यात एक दिवस का होईना समाधानाचा आणि आनंदाचा आणला. अतुलच्या हाॅटेल व्यवसायातील यशस्वीतेची दखल राज्यभरातील प्रसारमाध्यमांनी घेतली आहे.
सोशल मीडिया,प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयावर त्याच्या नावाचा आणि हाॅटेलचा नेहमीच गवगवा असतो.
अतूल कोणतेही काम हटके करतो,मग ते व्यवसायातील असो की सामाजिक बांधिलकी मानून जबाबदारीने समाजहितासाठी केलेले काम,याची दखल प्रसारमाध्यमांकडून घेतली जाते.
शिवराज हाॅटेल लवकरच नव्या लुक मध्ये ग्राहकांच्या सेवेसाठी राॅयल शिवराज नावाने पुढे येत आहे.तर मावळातील शिवराजची चव पिंपरी चिंचवड मधील खवय्यांना चिंचवड आणि तळवडे येथे चाखता येणार आहे. व्यवसायात बिझी असणारे अतूल वायकर सामाजिक कामात संवेदनशील आहेत.
त्यांनी अनेक गोरगरीब नागरिकांना मदतीचा हात दिला. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलीस कर्मचारी, भाजी विक्रेते व गरजू नागरिकांना मास्कचे वाटप केले. आदिवासी पाड्यांवर, झोपडपट्ट्यांमधील शंभराहून अधिक कुटुंबांना अन्नधान्य वाटप केले होते. प्लॅस्टिक बंदीच्या जनजागृतीसाठी कापडी पिशव्यांचे मोफत वाटप व दिवाळीच्या वेळी आदिवासी पाड्यांवर फराळ वाटपाचा उपक्रमही राबविला होता.
आता पुन्हा लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांची व वाटसरूंची उपासमार होऊ नये म्हणून मोफत शिवराज थाळीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. २० एप्रिल ते १ मे दरम्यान दररोज दुपारी १२ ते २ या वेळात ही थाळी देण्यात येणार आहे.
दोन चपात्या, भात, वरण, भाजी आदींचा या थाळीत समावेश असेल. या उपक्रमाबाबत माहिती देताना अतुल वायकर यांनी सांगितले की, सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून गोरगरिबांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे.

error: Content is protected !!