दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
तळेगाव स्टेशन:
अनेक वर्षांपासून दुर्गम व खेडोपाडी भागातील विदयार्थ्यांची प्रवासा दरम्यान खुप मोठी गैरसोय होत आहे. एस.टी. बस वेळेवरती न येणे व काही ठिकाणी एसटीची सुविधाच नसल्यामुळे शाळेतील  विद्यार्थ्यांची खुप मोठया प्रमाणावरती गैरसोय होत आहे.
परिणामी विदयार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावरती खुप मोठा परिणाम होत आहे.दरम्यान  अनेक  विद्यार्थ्यांना अर्ध्यावरती शिक्षण सोडुन दयावे लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करता विदयार्थ्यांचे होणारे नुकसान व वाया जाणारा वेळ हे पाहता  एस टी बस तळेगाव आगार आपण  मावळ तालुक्यामध्ये ज्या भागात एसटी बसच्या असुविधा आहे, त्या भागात आपल्या मार्फत बसच्या सुविधा पुरवण्यात याव्यात. असे निवेदनात टाकवे नाणे गट भाजपा अध्यक्ष रोहिदास असवले यांनी म्हटले आहे ..
यावेळी  रोहिदास आसवले, दिगंबर आगिवले, तुकाराम कोंद्रे, रोहिदास जांभूळकर,दत्ता म्हसे,साईदास आंबेकर,मुन्नावर आत्तार, नारायण पांगारे, भाऊसाहेब वाडेकर उपस्थित होते.
तळेगाव एसटी बस आगार प्रमुख प्रमोद धायतोंडे
निवेदन दिल्यानंतर आगार प्रमुख यांनी दिलेल्या प्रतिक्रिया  वाहनगाव येथे विद्यार्थ्यांचे प्रवासा दरम्यान असुविधाचा झालेल्या प्रकाराचा विचार करून  तसेच दुर्गम भागांमध्ये विद्यार्थ्यांची होणारी पायपीट थांबावी अशी मागणी करण्यात आली.
  या सर्व गोष्टींचा विचार करता दिवाळीनंतर विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा सुरू करण्यात येतील.  पुढील प्रमाणे या भागात  शाळा,  कॉलेज भरण्याच्या  व सुटण्याच्या वेळी बस सुविधा उपलब्ध होणार. 1) टाकवे ते राजपुरी.
2) टाकवे, वाहनगाव, खांडी,  निळशी.
3)  टाकवे, भोयरे, सावळा
या भागात दिवाळीनंतर एसटी बस सुविधा सुरू करण्यात येतील तसेच ज्या ग्रामीण दुर्गम भागांमध्ये विद्यार्थ्यांसाठी  शिक्षणा दरम्यान अशा समस्या आहेत .त्या भागातील लोकप्रतिनिधींनी एसटी आगार तळेगाव या ठिकाणी येऊन भेटी देऊन शाळेच्या वेळी कळवाव्यात  यामध्ये समन्वय साधून विद्यार्थ्यांसाठी शाळा, कॉलेज भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत  बस सुरू करण्यात येतील. अशी माहिती तळेगाव एसटी आगार प्रमुख  प्रमोद धायतोंडे यांनी दिली असल्याचे रोहिदास असवले यांनी सांगितले.

error: Content is protected !!