ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
मुंबई:
प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेने ए.सी.लोकल चालू केल्या रेल्वे प्रशासन हळू हळू या लोकलची संख्या वाढवत आहे. या बद्दल यांचे स्वागत आहे. परंतू जस जशी ए.सी.लोकलची संख्या वाढत जाणार तसं तसं डबेवाला कामगारांना त्याचा फटका बसत जाणार आहे.
कारण ए.सी. लोकलला लगेज डबा नाही.जर पिक अवर्स मध्ये या लोकलची संख्या वाढवली तर त्याचा मोठा फटका डबेवाले कामगारांना बसू शकतो कारण सकाळी ९/१० वाजता डबेवाला घरून डबा कलेक्ट करतो. व दुपारी १२ वाजे पर्यंत डबा कार्यालयात पोहचवतो . या वेळत जर ए.सी. लोकलची संख्या वाढवली.
तर या लोकलला लगेज कंपार्टमेंन्ट नसल्या मुळे डबेवाला जरी स्टेशनला वेळेवर आला तरी या लोकलने तो प्रवास करू शकत नाही. डबेवाल्यांची सप्लायचेन ही लोकलच्या वेळेवर अवलंबुन आहे. या मुळे सप्लायचेन खंडीत होऊ शकते ? डबे पोहचवण्याच्या वेळेवर त्याचा परिणाम होऊ शकतो ? म्हणुन ए.सी. लोकलला लगेज कंपार्टमेंन्ट असणे आवश्यक आहे.
तसेच मुंबईच्या लोकल वरील भार कमी करण्यासाठी मुंबईत ठिक ठिकाणी मेट्रो रेल्वे ची कामे जोरदार पणे चालली आहेत. ही सर्व कामे पुर्ण होणार आहे.
त्यामुळे मुंबईत मेट्रोचे जाळेच विनले जाणार आहे. परिणामी लोकल वरील भार काही अंशी कमी होईल. मुंबईत वर्सोवा-घाटकोपर मेट्रो धावते आहे. पण त्या मेट्रोला लगेज कंपार्टमेंन्ट नाही. तसेच ठरावीक लांबी,रूंदी, व वजनाचे सामान त्या मधुन नेण्यासाठी परवानगी दिली आहे. तात्पर्य काय तर मेट्रो मधुन डबेवाला कामगार डबे नेऊ शकत नाही.
आमचा साहेब मेट्रोने आपल्या कार्यालयात कामावर जावू शकतो.
सुभाष तळेकर म्हणाले,”
पण त्यांच मेट्रोने आम्ही त्या साहेबांचा डबा त्याच्या कार्यालयात पोहचू शकत नाही. अशी स्थिती आहे.
ही अडचण आम्ही तात्कालीन एम.एम.आर.डी.चे आयुक्त मदान साहेब यांच्या लक्षात आणुन दिली. तेव्हा त्यांच्या कार्यालयाच्या वतिने सांगितले, सुचना चांगली आहे. पण सध्याच्या मेट्रोला लगेज डबा लावायची सोय नाही. पण मागे पुढे जर मेट्रोच डबे वाढले तर या सुचनेचा निश्चित विचार करता येईल.
सध्या मेट्रो व मोनो रेल्वेची कामे जोरात चालू आहेत काही वर्षाने या सर्व मेट्रो धावू लागतील. तरी आमची मेट्रो प्रशासनाला विनंती आहे की मेट्रो आणी मोनो रेल्वेला लगेज डबा लावला जावा.
मुंबई फक्त कार्पोर्रेट मध्ये काम करणार्या अधिकार्यांची नाही. तर अंग मेहनत व कष्ट करणार्या कामगारांची सुध्दा आहे या कष्टकरी कामगारांनकडे  थोडेतरी सामान असते. त्या मुळे हा वर्ग मॅट्रो,मोनो रेल्वे व ए.सी. लोकलने प्रवास करू शकत नाही. तसं पाहील तर मुंबईच्या विकासात या  कष्टकरी,श्रमकरी कामगारांचे मोठे योगदान आहे हे योगदान लक्षात घेतां मुंबईच्या या कष्टकरी जनतेला आपले सामान आपल्या सोबत नेता यावे म्हणुन मेट्रो न मोनो रेल्वे व ए.सी. लोकलला एक लगेज डबा लावण्यात यावा, अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली.

error: Content is protected !!