वडगाव मावळ :
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शेतकरीहित आणी  कल्याणकारी योजना बॅंक कर्मचाऱ्यांनी  गावोगावच्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवाव्यात असे आवाहन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक माऊली दाभाडे यांनी केले.  
     वडगाव मावळ येथे बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल  विजय माधवराव टापरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यावेळी दाभाडे हे बोलत होते.यावेळी बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी डॉ ज्ञानदेव कदम,विभागिय अधिकारी गुलाब खांदवे,वसुली  अधिकारी नीरज पवार उपस्थित होते.
      पुणे जिल्ह्यातील शेतकरी आणी शेती पुरक व्यवसायासाठी बॅंकेने विविध कर्ज योजना तयार केलेल्या आहेत. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा यासाठी त्यांना या योजनेची  माहिती  सांगणे आवश्यक आहे. सर्व  कर्मचा-यांनी शेतकऱ्यांना गावोगावी जनजागृतीतुन  योजना समजावून सांगाव्यात असे आवाहन श्री दाभाडे यांनी केले.
     या कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन नीरज पवार  यांनी केले तर आभार विभागिय अधिकारी गुलाब खांदवे यांनी मानले.

error: Content is protected !!