‘उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘
कामशेत:
‘उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा अशी आर्त  साद  विठ्ठल भक्तानी लाडक्या पांडुरंगाला घातली. कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी या महिना भराच्या कालावधीत संपन्न होणा-या काकडा आरतीला मंगलमय वातावरणात सुरुवात झाली.
मावळ तालुक्यात शहर, ग्रामिण भागातील अनेक मंदिरांमध्ये आज पासुन (दि.१०) पहाटे काकड आरती सुरु झाली.कोजागिरी पोर्णिमा झाल्या नंतर अश्विन  महिन्यात काकडा आरती उत्सव चालु होतो.एक महिना दररोज पहाटे देवाला जागविण्यासाठी मंदिरात भजन मालिका मधील काकडा आरती भजन घेतले जातात .काकडा आरती करण्याची पद्धत ही सगळीकडे पुर्वीपासून  प्रचलित आहे.
गावातील महिला भगिनी देवाची आरती करण्यासाठी  आरतीचे ताट घेऊन मंदिरात उपस्थित आसतात यांत लहानमुल पासुन ते ज्येष्ठांचा मोठ्या प्रमाणात वारकरी यांचा सहभाग असतो.

error: Content is protected !!