
राजगुरुनगर:
भामा आसखेड धरणग्रस्तांनी शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची लांडेवाडी येथे भेट घेतली,आणि धरणग्रस्तांच्या समस्यांचा पाढा वाचला.
भामा – आसखेड धरणामुळे १७ गावे बाधित झाली आहेत. त्या १७ गावातील बाधित झालेले शेतकरी मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित होते .यांत प्रामुख्याने शासनाने जमिन वितरीत करण्यात यावी असा कोर्टाने आदेश दिलेले पण अद्याप शासनाने जमिन वितरीत केली नाही ,असे धरणग्रस्त शेतक-यांनी आढळराव यांच्या निदर्शनास आणून दिले.
संबधीत शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी यांचे कडून जमिन वितरीत करण्या बाबत दिरंगाई होते आहे. या शेतकऱ्यांना तातडीने जमिन वितरीत करण्यासाठी मुंख्यमंत्री वपुनर्वसन मंत्री एकनाथ शिंदे यांचे सोबत या शेतकर्यांची बैठक आयोजीत करून कायम स्वरूपी प्रश्न सोडवावा अशी मागणी आढळराव पाटील यांचे कडे करण्यात आली.
त्यांनी या प्रश्नात जातीने लक्ष घातले व या धरणग्रस्त शेतकरी यांनी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले, आढळराव म्हणाले,” मी मुख्यमंत्री शिंदे यांना भेटणार आहे , त्यांचे सोबत शेतक-यांची बैठक आयोजीत करून तुमचा प्रश्न मार्गी लावू.
या बैठकी आधी धरणग्रस्त समितीचे सत्यवान नवले यांनी धरणग्रस्तांचे प्रश्न मा. खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांचे समोर मांडले.
धरणग्रस्त समितीचे शंकर साबळे, काळूराम गडदे,दत्ताभाऊ होले,अनंथा ओझरकर,दत्तात्रय शिंदे,सुरेश कलवडे,दादाभाऊ पोंभाले,तुकाराम शिंदे,शंकर साबळे,तुकाराम नवले,माऊली कलवडे,विठ्ठल राजगुरव ,किसन नवले,सह सत्तर धरणग्रस्त उपस्थित होते. मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी आभार मानले.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




