मावळ तालुका शिक्षक भारतीच्या  अध्यक्षपदी गोरख जांभुळकर
वडगाव मावळ:
मावळ तालूका प्राथमिक शिक्षक भिरती संघटनेच्या अध्यक्षपदी गोरख जांभुळकर यांची तर महिला आघाडीच्या तालूका अध्यक्षपदी कविता शिवणेकर यांची निवड झाली. शिक्षक भारती संघटनेची सहविचार सभा झाली अध्यक्ष स्थानी किसनराव सातपुते होते.
  शिक्षक नेते विलास मोरे, पुणे जिल्हा विभागीय अध्यक्ष  अंकुश येवले, प्रसिद्धीप्रमुख संजय ठाकर, माजी अध्यक्ष संतोष राणे, माजी अध्यक्ष  मधूकर दळवी,राजेंद्र शेंडे, हिरामण बधाले,काळूराम थरकुडे,ज्ञानेश्वर मोरमारे,भरत पाठारे पदाधिकारी उपस्थित होते.
  पुढील तीन वर्षासाठी कार्यकारणीची निवड करण्यात आली.अध्यक्ष -गोरख जांभुळकर, सरचिटणीस- संतोष शेटे, कार्याध्यक्ष- समीर गायकवाड,उपाध्यक्ष- धोंडीबा घारे,काळूराम गुणाट,महादू केदारी,नथूराम गोडे व महिला आघाडीच्या अध्यक्ष पदी कविता शिवणेकरष,कार्याध्यक्ष स्वाती गायकवाड व सरचिटणीस विद्या नवघणे उपस्थित होते.
जांभूळकर यांनी पवना धरणग्रस्त  ग्रामविकास संस्थेचे सचिव व यापुर्वी शिक्षक संघटनेत कार्याध्यक्ष तसेच तळेगाव येथील प्राईम इलीगन्स गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन पद भूषवले.
पवनमावळातील दूर्गम ग्रामीण भागातील कोळे, विठ्ठलवाडी चावसर येथील वाड्या वस्त्यावर जाऊन ज्ञानदानाचे कार्य केले त्या ठीकाणी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर असलेल्या शालाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करून त्यांना ज्ञानदानाचे कार्य केले सध्या ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धालेवाडी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे.

error: Content is protected !!