खरमारेवाडीत गुरु पूजन सोहळा उत्साहात संपन्न
टाकवे बुद्रुक:
इंचगिरी रसाळ सांप्रदाय मावळ तालुका व साधू सेवा मंडळ खरमारेवाडी घोणशेत येथे आयोजित गुरु पूजेचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
गुरू पूजन सोहळ्याची ही परंपरा ३० वर्षापासून अखंडपणे सुरू आहे. दर वर्षी प्रमाणे  याही वर्षी हा सोहळा पार  पडला. सदगुरु समर्थ पांडुरंग महाराज रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सदगुरु समर्थ शंकर महाराज रसाळ यांच्या कृपाशीर्वादाने हा सोहळा होत असतो.
सर्व भाविक भक्त पंचक्रोशीतील सर्व नागरिक ग्रामस्थ मंडळी यांच्या उपस्थितीत किर्तन सोहळा झाला.गुरू पादपुजन, मिरवणूक, हरिपाठ, हरिकिर्तन, हरिजागर असे धार्मिक कार्यक्रम झाले. अन्नदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच गजानन खरमारे व आभार चंद्रकांत खरमारे यांनी मानले.

error: Content is protected !!