मावळमित्र न्यूज विशेष:
लहानपानपासूनच ती तशी क्रिएटिव्ह…अक्षर अन चित्रकला तिची छानच होती.शाळेतील विविध कार्यक्रमांमध्ये,स्पर्धेत ती सहभाग असायची. त्यामुळे कला क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली. आणि त्यामुळे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होत गेली.रांगोळी काढण्याचा हा धंद तिने जोपासला अन अनेक ठिपके जोडीत तिने कित्येक सुबक रांगोळ्या रेखाटल्या.
गालिचे, छत्रपती शिवाजी महाराज, महादेव देव, आई तुळजाभवानी, आई एकविरा देवी, विठ्ठल रुख्मिणी, महालक्ष्मी आई, वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पा तिने हुबेहुब रेखाटले. या आकर्षक रांगोळ्या पुढे
कार्यक्रमानुसार थीम रांगोळ्या, फ्री हॅन्ड रांगोळ्या, ठिपक्यांच्या रांगोळ्या काढत
वेगवेगळ्या रांगोळ्या काढत गेले छान आला की कौतुक व्हायचं  त्यामुळे  या केलेची आवड निर्माण होत गेली. त्याच बरोबर मी मेहंदी देखील उत्तम प्रकार काढते हा छंद जोपसण्यासाठी तिचे वडील ही तिची प्रेरणा .कोणती स्पर्धा असली की, वडील तिच्या  सोबत कायम असायचे. वेगवेगळ्या रांगोळ्यांचे फोटो दाखवायचे.ताई, ही रांगोळी काढून पहा तुला ती नक्की जमेल असे प्रोत्साहन द्यायचे. हे प्रोत्साहन घेत घेत ती आता पर्यंत रांगोळ्या काढत आले आहे.
तिने प्रकारच्या रांगोळ्या काढल्या आहेत. गालिचे, हिंदवी स्वराज्यचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महादेव देव, आई तुळजाभवानी, आई एकविरा देवी, विठ्ठल रुख्मिणी, महालक्ष्मी आई, वेगवेगळ्या प्रकारचे गणपती, कार्यक्रमानुसार थीम रांगोळ्या, फ्री हॅन्ड रांगोळ्या, ठिपक्यांच्या रांगोळ्या काढण्यात तिचा हात खंडा आहे.
प्रिती बाळासाहेब घुले असे तिचे नाव.
आता ती सौ.प्रिती  नितीन आदक झाली आहे. पदवीधर असलेल्या प्रितीने डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स  अँड टेलीकम्युनिकेशन मध्ये आपले करिअर केले. मावळ तालुक्यातील  कातवी येथील हे घुले कुटुंबीय. माहेरच कुटुंब तस बरच मोठं ४ चुलते, एक आत्या आणि ही सगळी भावंडं . मावळ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते  पै.शातंन घुले, नाथा घुले हे चुलते तर  बाळासाहेब घुले हे  वडील. २०१७ साली हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. गणेश घुले, शुभम घुले, सत्यम घुले, वंश घुले हे भाऊ .
मोठा भाऊ गणेश घुले गेले २० वर्षांपासून सिग्मा कंपनी चाकण येथे कार्यरत असून गुणवंत कामगार या पुरस्काराने त्यालाही सन्मानित करण्यात आले आहे.
  आई बायडाबाई , भाऊ गणेश, वहिनी शीतल त्यांची मुलगी सई आणि मुलगा शिवराज कायमच तिच्या कलेचे कौतुक करून प्रोत्साहन देत आहे.तिचे  बालपण तसे मजेत गेले परंतु  आर्थिक परीस्थिती बेताचीच होती. १९९९ ला  कातवी येथून तळेगाव येथे राहणास आल्यावर. या काळामध्ये जी माणसं भेटली त्यांनी शिक्षणासाठी खूप मदत केली. आई वडिलांनी  अनेक संकटाना सामोरे जाऊन तिचे शिक्षण पूर्ण केले.
   भावाने  खूप कमी वयात कुटुंबाची जबाबदारी घेऊन शिक्षण अर्धवट सोडून कामाला  गेला.प्रितीचे शालेय शिक्षण रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन येथे झाले .तर महाविद्यालयीन शिक्षण ११ वी १२वी इंद्रायणी महाविद्यालयीन आणि पुढील शिक्षण नूतन महाराष्ट्र विद्या पॉलीटेक्नीक, पदवी चे शिक्षण सावित्रीबाई फुले महिला कॉलेज मध्ये झाले. आणि योगयोग असा की जिथे तिचे  शिक्षण झाले ,त्या नूतन महाराष्ट विद्या प्रसारक मंडळ या संस्थेत ती कार्यरत आहे. तसेच मावळातील सामाजिक कार्य करणारी कास्प प्लॅन हि संस्था ग्रामीण भागातील मुलाचा विकास करण्यासाठी कार्यरत होती. त्या संस्थेचा मी एक भाग होती हे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
   विद्यार्थी  विकास विभागाचे कै.तोंडारे सर यांच्या मुळे  देखील लहानपणापासूनच  तिच्या कलागुणांना वाव मिळाला.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लोणी – धामणी येथील नितीन आदक यांच्याशी २०१२ साली तिचे लग्न झाले. नितीन हे एका शेतकरी व सांप्रदायिक कुटुंबातील. सासरी सर्व कुटुंबीय नातेवाईक सर्वच माळकरी वर्गच. नितीन हे उच्चशिक्षित असून इंजिनिअर आहेत. शैक्षणिक क्षेत्रात १२ वर्ष प्राध्यापक ते प्राचार्य या पदावर काम केले आणि आता बहुराष्ट्रीय  सॉफ्टवेअर कंपनी मध्ये काम करत आहेत दीर प्रवीण  चाकण येते नामांकित कंपनी मध्ये काम करत असून जाऊबाई अश्विनी हि मेडिकल  व्यवसाय सांभाळत आहे. सासरी सर्व शैक्षणिक वातावरण आहे.
मुलगी ध्रुवी नितीन आदक तिच्या जीव की प्राण आहे. प्रिती नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी येथे गेली १३ वर्ष कार्यरत असुन शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना विद्यार्थी विकास विभाग, ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग, अनेक विद्यार्थी संलग्न उपक्रमात सहभागी होत असते ,तसेच शैक्षणिक उपक्रमांना प्रसिद्धी मिळवून देण्याचे काम देखील करत आहे.
या सर्व कला जोपासत असताना या सर्व गोष्टींचे श्रेय ती  आई आणि वाहिनी शीतल हिला देते. कारण  संसार, नोकरी, मुलगी आणि माझ्या कलेला वेळ देत असताना ध्रुवी हिला लहानपानापासून जास्त मायेची ऊब आजी आणि मामी यांनी दिली.
प्रिती म्हणाली,” माझ्या यशात पती नितीन, भाऊ  गणेश, शुभम, सत्यम यांच्या भक्कम आधारामुळे  मला या गोष्टी करता येत आहेत. तसेच चुलते पै. शंतनु घुले व चुलती कल्पना घुले माजी आत्या कमल भेगडे माझ्या कलेला दाद देत असतात.  विद्यार्थी विकास विभागात काम करत असताना मी प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक प्रा. विजय नवले यांच्या माध्यमातून खूप चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या. नूतन कॉलेज मध्ये काम करत असताना कामाच्या वेळेमध्ये मी बऱ्याच वेळा  कॉलेज मध्ये रांगोळी काढत असते. माझ्या समवेत कार्यरत असणारे श्री. विजय शिर्के, श्री. संतोष शेळके, श्री. सुधाकर ढोरे,  संस्थचे सचिव श्री. संतोष खांडगे, सौ. रजनीगंधा खांडगे, माझ्या मैत्रिणी, माझे सहकारी,  माझ कौतुक करणारे नातेवाईक  यांचा देखील मजा जडणघडणीत मोलाचा  वाटा असून प्रत्येक रांगोळीसाठी मला सनी  वाघमारे मदत करत असतात. हा लेख माझे वडील कै. बाळासाहेब बाबुराव घुले यांना समर्पित.(शब्दांकन- सौ.अर्चना रामदास वाडेकर)

error: Content is protected !!