
वडगाव मावळ:
आंदर मावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी वैभव राजाराम पिंगळे यांची निवड करण्यात आली,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष समीर कदम यांनी ही निवड केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी पक्ष संघटना बळकट करण्यासंदर्भात व युवकांचे पक्ष संघटनेचे योगदान या संदर्भात मार्गदर्शन केले. या आढावा बैठकीच्या निमित्ताने किशोर सातकर, कैलास गायकवाड , अमोल केदारी यांनी मनोगत व्यक्त केली.
संघटनमंत्री नारायण ठाकर. माजी सरपंच दत्ता पडवळ,सरचिटणीस रामदास वाडेकर, प्रवक्ते राज खांडभोर. ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष आशिष ढोरे ,कार्याध्यक्ष सचिन मुऱ्हे, कार्याध्यक्ष आशिष माने,अध्यक्ष युवक आंदर मावळ,भारत अदिवळे,सचिव मंगेश जाधव, सचिव स्वामी जाधव,नवनाथ अडीवळे उपस्थीत होते.
वैभव राजाराम पिंगळे म्हणाले,” पुढील काळात संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी वर्गांचे प्रश्न सोडवण्याचा नीच्छित प्रयत्न केला जाईल. तसेच विद्यार्थी संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




