
वडगाव मावळ :
शेतीपुरक पोल्ट्री व्यवसायाला ग्रामपंचायतीकडून पोल्ट्री शेडवर आकारणी करण्यात येत असलेली घरपट्टी (पोल्ट्री टॅक्स)माफ करण्यात यावी अशी एकमुखी मागणी मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेच्या विशेष सभेत करण्यात आली.
वडगाव मावळ येथे संघटनेची विशेष सभा पोल्ट्री उद्योजक एकनाथ गाडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सभेस प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबुराव अप्पा वायकर, संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष केदारी, उपाध्यक्ष उत्तम शिंदे, संतोष घारे,सोमनाथ राक्षे,सचिव प्रविण शिंदे, सहसचिव महेश कुडले,खजिनदार विनायक बंधाले,सचिन आवटे,संभाजी केदारी,संभाजी शिंदे आदी उपस्थित होते.
मावळ तालुक्यात शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणुन पोल्ट्री व्यवसाय करीत आहेत.त्यांनी उभारलेल्या पोल्ट्री शेडवर ग्रामपंचायतीकडून अवास्तव घरपट्टी (पोल्ट्री टॅक्स) आकारण्यात येत आहे. काही ग्रामपंचायतीकडून तर गावातील बंगल्यापेक्षा जास्त आकारणी होत आहे. वास्तविक पाहता पोल्ट्री हा व्यवसाय शेती व्यवसाय म्हणून आहे.शेती व्यवसायावर कोणताही कर नाही .मात्र शेतीपुरक पोल्ट्री व्यवसायाला ग्रामपंचायतीकडून पोल्ट्रीशेडवर टॅक्स आकारणी होत. ही कर आकारणी अन्याय कारक आहे. ही कर आकारणी अन्याय कारक असल्याने त्वरित रद्द करण्यात यावी अशी एकमुखी मागणी या सभेत करण्यात आली. हा ठराव संघटक सोनबा गोपाळे गुरूजी यानी सभेत सादर केला. त्यास सभेतील सर्वांनी एकमुखी पाठींवा दिला.
आपल्या या मागणीसाठी आपण मावळ पंचायत समिती आणि पुणे जिल्हा परिषदेकडे विशेष प्रयत्न करू अशी ग्वाही माजी कृषी सभापती बाबुराव अप्पा वायकर यांनी दिली.
या सभेत संघटनेच्या भक्कम बांधणीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष एकनाथ गाडे यांनी केले आहे. कार्याध्यक्ष सुभाष केदारी यांनी आभार मानले. तर संघटक सोनबा गोपाळे गुरूजी यानी आभार मानले. सभेस पोल्ट्री उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




