
वडगाव मावळ :
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने मावळ तालुक्यातील शेती विकास सहकारी संस्थांची अनिष्ठ तफावत दुर करण्यासाठी 2 कोटी 51लाख रुपयाचा आर्थिक निधी दिला असल्याची माहिती सहकार महर्षी व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे यांनी दिली.
मावळ तालुक्यातील 55 सहकारी सोसायट्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून मोठया प्रमाणावर कर्जे घेतलेली आहेत. मात्र त्यातील काही सोसायट्यांकडे मोठ्या प्रमाणात बॅंकेचे कर्ज थकबाकी थकलेली आहे. त्यातील 34 सोसायट्या ह्या कर्ज *थकल्याने* अनिष्ठ तफावतीमध्ये गेलेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांना कर्ज उपलब्ध करून देता येत नाही. तर अनेकजण आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन माऊली दाभाडे यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे सोसायट्यांची अनिष्ठ तफावत दुर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून बॅंकेकडून मोठा निधी मंजूर करून घेतला.
दाभाडे यांचे आग्रही मागणीमुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने मावळ तालुक्यातील 34 शेती सहकारी संस्थांना 2 कोटी51 लाख रूपये निधी उपलब्ध करून दिला. यामुळे या 34 शेती विकास सोसायटींची आर्थिक अडचणीपासुन सुटका झाली.
अजुनही मावळ तालुक्यातील 9 शेती विकास सोसायट्या ह्या अनिष्ठ तफावतीमध्ये आहेत. त्यामुळे या सोसायटीच्या सभासदांना कर्ज उपलब्ध होत नाही. या संस्थांचा तोटा दरवर्षी प्रचंड प्रमाणात वाढत चाललेला आहे. परिणामी लवकरच या संस्था शेजारच्या सहकारी संस्थामध्ये विलीन केल्या जाणार आहेत.
मावळ तालुक्यातील वडगाव,शिवणे, शिवली,कोथुरणे,साळुंब्रे,टाकवे,बौर, खांडी आणि पुसाणे या संस्था अनिष्ठ तफावतीमध्ये आहेत. या संस्थांच्या सभासदांकडे बॅंक आणि सोसायट्यांची मोठी कर्ज थकबाकी येणे आहे.
या संस्थाची पंचकमिटी चेअरमन,सचिव इतर पदाधिकारी यांनी थकलेली कर्जबाकी वसुली केल्यास त्या संस्थानांही बॅंक असा निधी देईल असे श्री दाभाडे यांनी यावेळी सांगितले.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




