
लोणावळा:
पोटापाण्यासाठी नेपाळमधून लोणावळ्यात आलेल्या कुटुंबातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या नात्यातीलच व्यक्तीकडून दारू पाजून अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. हा प्रकार उघडकीस आला असून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केलं आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ,” मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास लोणावळा शहराजवळ असलेल्या वरसोली, ता.मावळ याठिकाणी हा घृणास्पद प्रकार घडला .
पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली असून आरोपी शंकर पानसिंग बहाद्दूर थापा (वय ४४, सध्या रा. वरसोली, ता. मावळ, मूळ रा. शिवडी, पो. चौरपाटी, जि. अझाम, नेपाळ) याला लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
आरोपी शंकर याने पीडित मुलगी आणि तिचा ७ वर्षीय भाऊ यांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी म्हणून घरातून बाहेर नेले. त्यानंतर त्यांना एका पडीक जमिनीवर घेऊन जाऊन पीडित मुलीला त्याठिकाणी दारू पाजून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी भा.द.वि. कलम 376 (2) (एफ), बाल लैंगिक अत्याचार कायदा 2012 कलम 4, 8, 10, 12 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास म.पो.उप.नि. सुरेखा शिंदे या करीत आहेत.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




