सागर काळे यांचा मावळ तालुका भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष पदी निवड
पवनानगर :
ब्राम्हणोली येथील सागर शांताराम काळे यांचा मावळ तालुका भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
मावळ तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष संदिप काकडे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.
सागर काळे हे पवनमावळातील युवा उद्योजक म्हणून सुपरिचित आहे त्यांचे ठाकुरसाई पवना फार्म नावाचे हॉटेल आहे. व्यवसायाच्या माध्यामातून अनेक तरुणांना रोजगार निर्मिती करून दिले आहेत तसेच पवनमावळातील अनेक सामाजिक व विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो पवनमावळातील अनेक तरुणांशी त्यांचा चांगला संपर्क आहे त्याचीच दखल घेऊन त्यांना भाजपाच्या वतीने ही जबाबदारी देण्यात आली आहे
निवडीनंतर बोलताना सागर काळे म्हणाले की, मावळचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येयधोरणे पवनमावळातील युवकांपर्यंत पोहचून पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न केले जातील.

error: Content is protected !!