संस्कार प्रतिष्ठानचा नवरात्रोत्सव  बंदोबस्त
पिंपरी:
संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने चतुश्रुंगी नवरात्र उत्सवामध्ये संपुर्ण १० दिवस संस्कार प्रतिष्ठानचे विशेष पोलीस अधिकारी म्हणुन सभासद परिमंडळ ४ पुणे शहर पोलीस अंतर्गत चतुश्रुंगी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ३० सभासद  चतुश्रुंगी देवस्थान परिसरात बंदोबस्त केला.
सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत वाहतुक नियंत्रणापासुन ते मंदिराच्या गाभाऱ्यात पर्यंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली  बंदोबस्ताला मदत करित होते.दस-याच्या दिवशी देवीची पालखी व मिरवणूक शांततेत पार पडल्यानंत्तर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व विशेष पोलीस अधिकारी यांचे कौतुक करण्यात आले. समारोप प्रसंगी प्रत्येक सभासदाला प्रमाणपत्र व मिठाईचा बॉक्स देऊन सन्मानित करण्यात आले
तसेच चतुश्रुंगी वाहतुक विभागाचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब कोळी आणि पोलीस उपनिरिक्षक श्री मोहन जाधव यांनी सर्व सभासदांचे कौतुक करुन त्यांनीही प्रत्येक सभासदाला प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले प्रतिष्ठानचा हा पहिलाच सन्मान असा होता की दोन्हीही विभागांनी कौतुक केले संस्थेच्या वतीने अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांनी आभार मानले.

error: Content is protected !!