दस-याला डबेवाल्यांनी केले सायकलचे पूजन
मुंबई:
डबेवाल्यांना सर्वात जास्त उपयुक्त वाहन कोणते आहे, तर ते आहे “ सायकल” .सायकल एक पर्यावरण पुरक वाहन आहे सायकल चालवण्याने पर्यावरणाचा -हास होत नाही. सायकलचा मेन्टनस झिरो आहे. एकदा हवा भरली की महीनाभर चालते. बर.. सायकल चालवायला परिवहन विभागाचा परवाना लागत नाही. सायकल चालवण्याने तब्यत तंदरूस्थ रहाते. सर्वात महत्वाचे मुंबई मधिल वहातुक कोंडी मधुन डबेवाल्याला वेळे वर पोहचवते ती  सायकल. कारण वहातुक कोंडी जरी झाली तरी सायकल वहातुक कोंडीत अडकू शकत नाही.
डबेवाला अचूक पणे व वेळेवर सेवा देतात म्हंणुन डबेवाल्यांना “ सिक्स सिग्मा “ हे मानांकन मिळाले. डबेवाल्यांचे नेते मॅनेजमेंट गुरू कै. गंगाराम तळेकर व्याख्याना मध्या मानांकनाचे विभाजन करून सांगत मुंबईत  दोन दोन मिनीटांत लोकल धावते आणी वेळेवर धावते लांबचा पल्ला कमी वेळेत ती पुर्ण करते म्हणुन लोकलला दोन सिग्मा दिले होते. दोन सिग्मा सायकलला दिले होते .
कारण मुंबई मधिल वहातुक कोंडीत सायकल आम्हाला अडकू देत नाही म्हंणुन डबेवाला वेळेवर आपली सेवा देत आला आहे. दोन सिग्मा डबेवाल्यांच्या टिम ला दिले होते कारण टिमवर्क चांगले नसते तर हे यश मिळाले नसते.. अशी सिक्स सिग्माची विभागणी केली होती.
दोन वर्ष करोनाने घालवली लॅाक डाऊन झाले डबेवाल्यांचा व्यवसाय बंद झाला सायकली दोन वर्ष स्टेशन बाहेर पडून होत्या पाऊस पाण्यात त्या भिजल्या, गंजल्या, काही सायकली सडून गेल्या, नादुरूस्थ झाल्या.
करोना कमी झाला व्यवसायाला हळूहळू सुरवात झाली डबेवाल्यांनी ज्या सायकली दुरूस्थ होतील अशा सायकली दुरूस्थ करून घेतल्या बाकी नविन सायकली घेतल्या व्यवसायाला सुरवात केली. अजून ही पुर्ण क्षमतेने डबेवाल्यांचा व्यवसाय चालू नाही म्हणावे तसे आर्थीक उत्पन्न नाही तरी तो कसाबसा व्यवसाय करतो आहे.
मुंबई डबेवाले असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर म्हणाले,”
दस-याच्या पाश्र्वभूमीवर स्टेशन बाहेर पार्क केलेल्या सायकली परंपरेने पुजल्या. पुजन करताना सायकलला मनोमन त्यांने नमस्कार केला आणि आमच्या व्यवसायात अशीच तुझी साथ राहूदे अशी मागणी केली.

error: Content is protected !!