टाकवे बुद्रुक:
आंदर मावळातील कोंडिवडे येथील शेतकरी लक्ष्मण तलावडे यांच्या वावरात  सुमारे साडे तीन फुट लांब दोडका वाढला. या दोडक्याचे पंचक्रोशीत आकर्षण असून हा दोडका पहायला गर्दी होत आहे.
  तलावडे यांनी त्यांच्या शेतात दोडक्याचे बी पेरले होते.जुलै महिन्यात त्याची लागवड केली होती.  शेतीमध्ये त्यांनी लागवड केल्यानंतर आपल्या गोठ्या मधील शेणखत याठिकाणी टाकले होते त्या शेणखताच्या जोरावरती  दोडक्याचा वेल चांगल्या प्रमाणात भरला.  यामध्ये केमिकलयुक्त कोणतेही खत वापरले नाही या ठिकाणी सेंद्रिय खताचा संपूर्णपणे वापर केला  व मातीचे प्रमाण अधिक प्रमाणात असल्यामुळे परिणामी या ठिकाणी दोडक्याचे चांगले उत्पन्न होणार आहे.
   लांबलचक साडेतीन फुटाचा दोडका वाढला आहे.
  लक्ष्मण तळवडे यांनी साडेतीन फुटाचा दोडका आल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. केमिकल युक्त खतापेक्षा सेंद्रिय खतांमुळे  रोपांना  चांगले जीवनसत्व मिळते. परिणामी अधिक प्रमाणावरती सर्वांनी सेंद्रिय खताचा उपयोग करावा  असे आवाहन शेतकरी तळवडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!