डबेवाले वाजत,गर्जत,गुलाल उधळत शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला जाणार !
मुंबई:
शिवसेना फुटीच्या पार्श्वभुमीवर डबेवाले कामगारांमध्ये चलबिचल निर्माण झाली होती. परंतु मावळ,मुळशी,खेड आंबेगाव,जुन्नर तालुक्यांतील बहुतांश डबेवाले आणि डबेवाल्यांचे कुटुंबीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत प्रामाणिक राहीले आहेत अशी माहिती मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष गंगाराम तळेकर यांनी दिली.
तळेकर म्हणाले,”  खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. त्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच आहेत.  या भागातील डबेवाले कामगार दुसऱ्यांचे नेतृत्व मान्य करणार नाही. त्यामुळे शिवतीर्था वरील दसरा मेळाव्याला डबेवाले वाजत,गाजत, गुलाल उधळत जातील.
मुंबई डबेवाले असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर म्हणाले,”
“मुंबई डबेवाला असोशिएशन” मा.उध्दव ठाकरे यांचे सोबत आहे. मुंबईचे डबेवाले शिवसेने सोबत काल ही होते,आज ही आहेत आणी उद्या ही राहतील ! मुंबईत मराठी अस्मिता जपण्याचे काम शिवसेनेने केले आहे. मराठी माणसाच्या अस्मितेशी शिवसेनेची नाळ जोडली गेली आहे. म्हणुन “ मुंबई डबेवाला असोशिएशन” अडचणीच्या काळात मा.उध्दव ठाकरे यांचे सोबत आहे.

error: Content is protected !!