डबेवाल्यांना दिवाळी बोनस मिळाला पाहिजे
मुंबई:
सव्वाशे वर्षा पासुन मुंबईत डबेवाला आपल्या ग्राहकाला जेवणाचे डबे पोहचवण्याची सेवा देत आला आहे.
पण कोव्हिड आला, लॅाक डाऊन झाले. वर्क फॅार्म होम याचा मोठा परीणाम व्यवसायावर झाला त्या मुळे व्यवसायाची घडी विस्कटली व्यवसाय कमी झाला अनेक डबेवाल्यांनी रोजगाराच्या दुसर्या संधी शोधल्या. पण काही डबेवाले अपुरा रोजगार, कमी उत्पन्न असताना देखील डबे पोहचवण्याचे काम चिकाटीने करत आहेत.
दिवाळीसणाला ग्राहक डबेवाला कामगाराला एका महीन्याचा जादाचा पगार बोनस म्हणुन खुशीने देत आला होता हि एक परंपरा कायम होती. पण कोव्हिड आला आणी ही परंपरा काहीशी खंडीत झाली होती. पण आता काही डबेवाले मुंबईत आपली सेवा देत आहेत. आमची ग्राहकांना विनंती आहे की आपल्याला सेवा देणार्या डबेवाला कामगाराला या वर्षी दिवाळीला एक महीन्याचा अधिकचा पगार खुशीने बोनस म्हणुन देण्यात यावा व खंडीत झालेली परंपरा पुन्हा चालू करावी.
मुंबई डबेवाले असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर म्हणाले,”
दिवाळी हा मोठा सण आहे हा सण साजरा करत असताना खर्च ही बराच येतो डबेवाला कामगार गरीब आहे त्याला हा खर्च परवडू शकत नाही तेव्हा “ मुंबई डबेवाला असोशिएशन” ची ग्राहकांना विनंती आहे की आपण दिवाळीसणासाठी परंपरे नुसार एक महीन्याचा अधिकचा पगार डबेवाला कामगाराला बोनस म्हणुन आपल्या खुशीने देण्यात यावा की जेणे करून त्या बोनस मुळे डबेवाला कामगार आपल्या कुटुंबा सोबत दिवाळसण साजरा करू शकतो.

error: Content is protected !!