मावळमित्र न्यूज विशेष:
  राज्यात सत्तांतर झाले.भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाल्यावर अनेक राजकीय उलथापालथ झाल्या.आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गेल्या. न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात आले. शिवतीर्थावर दसऱ्याला मेळावा कोणाचा? याही चर्चेने राज्यभर रान पेटले.दसरा मेळावासाठी दोन्ही गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यासाठी चढाओढ सुरू केली आहे.
  बस, कार, रेल्वे जे वाहन मिळेल त्या वाहनांतून वाजत गाजत या अशी साद पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपापल्या शिवसैनिकांना केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला साद घालीत मावळ तालुक्यातील कडवा शिवसैनिक अनवाणी पायाने सावळा गावातून पायी चालत शिवतीर्थाकडे निघाला आहे.
  त्याची वेशभुषा पूर्णपणे भगवी कपडे असून कपाळाला भगवा लावला आहे.
  जय भवानीचा जयघोष करीत हा तरूण रोज चालत चालत पुढे निघालाय. प्रत्येकाची सेवेची त्यागाची श्रद्धेची पद्धत वेगळी असते. आपल्याला भावेल तो आदर्श आपण घ्यायचा असतो.असेच एक आदर्श व्यक्तिमत्व असलेले… शिवसेना, बाळासाहेब आणि उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर नितांत श्रद्धा आणि निष्ठा असलेले श्री. शोभिनाथ भोईर हे आजपासून गाव सावळे, मावळ, पुणे येथून दसरा मेळावा, शिवाजी पार्क पर्यंत चालत प्रवास करणार आहेत.त्यांच्या या श्रद्धेचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!