पवनानगर:
ब्राम्हणोली येथील अंकुश रामचंद्र काळे यांची पवनमावळ  भाजपा सोशल मिडिया अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
आज वडगाव येथे  कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.
अंकुश काळे यांची कुटुंब अनेक वर्षांपासून भाजपाशी एकनिष्ठ असलेले कुटुंब आहे  अंकुश सध्या ब्राम्हणोली येथील जय हनुमान ढोल मंडळाचे अध्यक्ष आहे पथकाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग ढोल पथकाच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करुन आर्थिक साधन म्हणून उपयोग करण्यात यशस्वी, क्रिडा क्षेत्रात पवनमावळ मल्ल सम्राट प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षे कुस्ती स्पर्धा आयोजित करुन नवनवीन तरुण मल्ल घडवण्यासाठी प्रयत्न या अनेक उपक्रमामुळे पवनमावळातील तरुणांशी त्यांचा चांगला संपर्क आहे याचीच दखल घेऊन त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य वसंत काळे, ब्राम्हणोली भाजपा अध्यक्ष शंकर काळे पाटील,मावळ तालुका भाजपा क्रिडा आघाडीचे सरचिटणीस संतोष दळवी, धोंडीबा काळे, शंकर काळे आदी उपस्थित होते.
निवडीनंतर अंकुश काळे म्हणाले, “माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पवनमावळातील युवकांपर्यंत पक्षाच्या ध्येयधोरणे पोहचवून पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न केले जातील.

error: Content is protected !!