जय श्रीराम..भारत माता की जय.. कामशेत पंचक्रोशीत दुर्गा दौड उत्साहात
कामशेत :
मावळमधील कामशेत शहरात श्री दुर्गा दौड सकाळी गेल्या तीन दिवसांपासून घेतली जात आहे. ही दुर्गा दौड बजरंग दल व हिंदू उत्सव समिती कामशेत यांच्या वतीने घेण्यात येत आहे.
या दुर्गा दौड साठी सकाळी सकाळी भल्या पहाटे उठून सर्व वीर बजरंगी व दुर्गा एका मंदीरापासुन दुसऱ्या मंदिरापर्यंत देवी-देवतांच्या,राष्ट्रपुरुषांच्या,क्रांतिकारकांच्या नावाचा जयघोष करत ठरलेल्या मार्गनुसार दौडमध्ये मार्गक्रमण करत असतात.तर समारोपाच्या ठिकाणी मंदिरात जाऊन आरती करून शक्तीचा जागरही केला जातो.या दौडीत मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणीं सहभागी झाल्या होत्या.दुर्गामाता दौड मध्ये तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती, देशप्रेम जागृत करणे तसेच सूर्यनमस्कार,व्यायामाचे महत्त्व,लवकर उठल्याने होत असलेले फायदे,दुर्गामाता दौड मध्ये सांगितले जातात.
कामशेत शहरात अनेक वर्षांपासून ही दुर्गा दौड घेतली जाते.यावेळी जय श्रीर्राम, भारत माता की जय अशा घोषणा देत हिंदू धर्माचे,स्त्रीशक्तीचा जागर केला जातो.ज्या भागातून ही दौड जाते त्या भागातील नागरिक रस्त्यावर रांगोळी कडून तिचे मोठ्या उत्साहात स्वागत करून भगव्या ध्वजाचे मनोभावे पूजन करताना दिसून येत आहे.

error: Content is protected !!