महिला सक्षमीकरणावर भर देणा-या प्रथम लोकनियुक्त सरपंच: सविता भांगरे
मावळमित्र न्यूज विशेष:
सरपंच हे मानाचे आणि सन्मानाचे पद. या पदाची उंची लोकसहभाग आणि केलेल्या विकास कामाने वाढतेच. महिला सक्षमीकरणावर भर देत,गावातील महिलांना चूल आणि मूल या संकल्पनेच्या बाहेर काढून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राबणा-या महिला सरपंचांच्या यादीत निगडे ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सविता बबूशा भांगरे यांचे नाव आवर्जून घेतले जाते.
हे आज सांगण्याचे कारण, आपण नवरात्रोत्सव आनंदात साजरा करीत आहोत. स्त्री शक्तीच्या कर्तृत्वाचा हा जागर. प्रत्येक स्त्री आपापल्या परीने यशस्वी असतेच. तिच्या कर्तृत्वाचा आलेख सारा समाज गातो. तिने केलेल्या कार्याचे किंचितसे जरी कौतुक झाले तर ती, तिला मूठभर का होईना मास चढतेच. इतकेच काय ती आपली जबाबदारी अधिक नेटाने समर्थपणे पेलते.
याची अनेक उदाहरणे आपण पावलोपावली पाहत असतो. याचे एक उदाहरण म्हणजे  स्मार्ट व्हिलेज कडे वाटचाल करणा-या निगडे गावच्या सरपंच सविता भांगरे. त्यांनी महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला आहे. यासाठी त्यांनी पाच वर्षात गावात विविध प्रशिक्षण शिबीरे घेतली असून गावातील महिलांचा आत्मविश्वास वाढीसाठी त्या प्रयत्नशील आहे.
भांगरे यांंच्या सासरी राजकारणाचा कोणातच वारसा नाही. मात्र त्यांच्या माहेरी त्यांचे वडील बबनराव गावडे साते ग्रामपंचायतीचे सदस्य होते. राजकारणाचा हाच धागा पकडून मागील पंचवार्षिक निवडणुकीत सविता भांगरे यांना त्यांच्या पॅनल मधील कार्यकर्त्यांनी आग्रहाने निवडणुकीत उभे केले. आणि त्या चार वर्षापूर्वी प्रथम लोकनियुक्त सरपंच झाल्या.
सरपंच पदाची हवा डोक्यात जाऊ न देता पाय जमिनीवर ठेवून डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असा स्वभाव अंगी बाळगून त्यांनी महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिले.
यासाठी शाळा,अंगणवाडी ही बलस्थाने निवडून त्यावर त्यांनी काम करायला सुरुवात केली.
महिला सक्षमीकरणाची नाळ अधिक घट्ट करण्यासाठी
महिला प्रशिक्षण भर दिला आहे . शिवणकाम,ब्युटी पार्लर,केक बनविणे,मसाले बनवणे,हस्तकला प्रशिक्षण, महिला बचत गटाचे जाळे विणले. महिला उद्योजक प्रशिक्षण सुरू आहे.
सविता ताई यांना महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचा आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.अखिल भारतीय सरपंच परिषद मावळ तालुका उपाध्यक्ष पद
या शिवाय शिवसेनेने पुरस्कार देऊन सन्मान केला. ग्रामपंचायत कार्यालय,भव्य सभामंडप ही भविष्यातील कामे दृष्टीक्षेपात आहे. सर्व सण सभारंभात महिला दिन आवडता सोहळा.या सोहळ्यात काबाडकष्ट करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना ‘ श्रमप्रतिष्ठा ‘पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,याचे फार समाधान आजही त्यांच्या चेहऱ्यावर आहे. गावातील पद्मावती देवी,कळमजाई देवीची मंदिरे त्यांची श्रद्धास्थाने. ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांवर प्रचंड निष्ठा या सर्वाच्या आशीर्वादाने सार्वजनिक कामासाठी अधिक बळ मिळते,असा त्यांचा दृढविश्वास आहे.
गावहायमॅक्स दिव्याने गाव उजळून गेले आहे. पथदिवे अन सौरदिवे गावची शोभा वाढवित आहे,उजेड देत आहे. या पुढे ही नाळ अशीच जोडून स्मार्ट व्हिलेज कडे वाटचाल करण्यासाठी महिलांचा सहभागातून अधिका नेटाने काम करण्याचा त्यांचा मनोदय आहे.
ग्रामस्थ,ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते,शाळा व्यवस्थापन समिती यांची एकजूट बांधली.सोबत महिला वर्गाचा पाठिंबा आहेच.
गावातील रस्ते,बंदिस्त गटारे,पाणी पुरवठा,कचरा व्यवस्थापन,पथदिवे ही नित्याची कामे करीतच दुर्लक्षित असलेल्या कुरणवस्ती, धारेची ठाकरवाडीत पाण्याची पायपीट थांबली..कॅडबरी ठाकरवाडीत सभामंडप झाला.सिमेंट काॅक्रीटचा रस्ता आदिवासी उंबरठ्या पर्यत गेल्याने विकासाची चाके अधिक गतिमान होण्यास बळकटी मिळाली ह
तरूण पिढीला व्यायामाची गोडी लागावी म्हणून व्यायाम शाळा गावात आणली.
अशा एक ना अनेक कामे करून विकास कामासाठी आग्रही असणा-या सविता ताई,या अत्यंत सुस्वभावी नेतृत्व करणा-या महिला अशी त्यांची ओळख पंचक्रोशीत ओळख आहे. मिळालेले पद हे मिरवण्यासाठी नसून ते जनतेच्या सेवेसाठी हे सुत्र सविता ताई आणि बबूशा भाऊ या दांपत्याने स्वीकारले आणि ‘सेवेचे व्रत अंगीकारले. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीची दखल अनेक सामाजिक संस्था संघटनांनी घेऊन त्यांना वेगवेगळ्या मानसन्मान व पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.नवरात्रोत्सवाच्या आनंदात त्यांच्याही कार्याचा उजाळा व्हावा म्हणून केलेला हा लेखन प्रपंच थांबूयात. उद्याच्या दिवशी पाहूयात शेती शाळेत रमणा-या कृषी पर्यवेक्षिका.(शब्दांकन- सौ.अर्चना रामदास वाडेकर)

error: Content is protected !!