
कामशेत:.
भूमीपुत्रांना कामावर घेतले पाहिजे अशा इशारा माजी राज्य मंत्री बाळा भेगडे यांनी केला.भाजप कामगार आघाडी आयोजित वेट एन जाॅय पार्क येथील बेधडक मोर्चा ला मार्गदर्शन करताना माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी मोर्चाला संबोधित करताना त्यांनी भूमीपुत्रांना कामावर घेतले पाहिजे असा इशाराच दिला.
वेट एन जाॅय येथील 22 कामगारांना कोरोना नंतर कमी करण्यात आले आहे त्या 22 कामगारांना त्वरित कामावर घेण्यात यावे अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल वेट एन जाॅय पार्क च्या अधिका-यांनी त्वरित निकाली द.यावा अशी मागणी करण्यात आली. भाजप तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, शांताराम कदम, नितिन मराठे,संदीप काकडे,शरद हुलावळे, किरण राक्षे आदींनी मार्गदर्शन केले
वेट एन जाॅय येथून सहा महिन्यांपूर्वी 22 कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे त्यांना कामावर घेण्यासाठी गेली दोन महिने या संदर्भात कंपनी प्रशासना सोबत चर्चा सुरू होती पण कंपनी प्रशासनाने याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही त्यामुळे भारतीय जनता पक्षाने धडक मोर्चा काढण्यात आला. कंपनी व आंदोलन मिटवण्यासाठी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी विशेष प्रयत्न केले त्यांचे सहकारी रावसाहेब चाटे,सर्कल माणिक साबळे उपस्थित होते.
या मोर्चाला सामोरे जाण्यासाठी वेट एन जाॅय चे अभिनेंदू गुप्ता यांना वारंवार बोलवून ही ते आले नाही.त्यामुळे आंदोलन करर्त्यांनी वेट ऐन जाॅय कडे जाणारा रस्ता जे बी.ने उखडला आहे.
यावेळी कामशेत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार व सहपोलीस कर्मचारी ह्यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला होता
मोर्चाचे नियोजन मावळ तालुका कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे अभिमन्यु शिंदे मच्छिंद्र केदारी,अमित हुलावळे, गणेश ठाकर किसन येवले, स्वप्नील भांगरे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यानी केले.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे



