
तळेगाव स्टेशन:
स्वप्ननगरी सार्वजनिक गणेश व नवरात्रोत्सव मंडळ, तळेगाव स्टेशन व हीलिंग हॅन्डस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवानिमित्त झालेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीरात पन्नास ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. व उपचारार्थ मोफत औषधोपचार करण्यात आले
शिबीर प्रमुख अनिता सैद यांच्या मार्गर्शनाखाली डाॅ.श्रुती देशपांडे, डाॅ. तेजश्री खलाटे यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. आनंद मिसाळ,तुषार खंडागळे,विक्रम साठे यांनी शिबीरात सहाय्य केले.
पोटाचे सर्व विकार मूळव्याध (पाईल्स), भगिंदर (फिस्चुला), बद्धकोष्ठता (शौचास साफ न होणे), फिशर, हर्निया, व्हेरीकोस व्हेन्स तसेच समतोल आहार आणि पोटाशी निगडित इतर सर्व आजार व विकारांवर मार्गदर्शन करण्यात आले.
जास्तीत जास्त लोकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राष्ट्रपती पोलीस पदक विजेते लहु पाटीलबुवा ढेरंगे यांनी केले होते,या आवाहनाला साद देत पोटाच्या आजाराशी संबंधित असलेल्या ज्येष्ठांनी आरोग्य तपासणी शिबीरास हजेरी लावली.
या शिबीरातील सतरा रूग्णांना पुढील उपचार सवलतीच्या दरात करण्यात येणार असून आवश्यक रूग्णांना सत्तर सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सैद यांनी सांगितले.
अधिक माहिती व संपर्कासाठी फोन नं.: 7774046853 संपर्क साधा.
हीलिंग हॅन्डस क्लिनिक, टिळक रोड
मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स, १०५, पहिला मजला, हिराबाग गणपती जवळ, टिळक रोड, पुणे २.
हीलिंग हॅन्डस क्लिनिक, ढोले पाटील रोड मिलेनीयम स्टार एक्सटेन्शन, रूबी हॉल, गेटच्या शेजारी, ढोले पाटील रोड, पुणे शिबिर संदर्भात संपर्कासाठी व नाव नोंदणीसाठी •
सौ. अनिता एस. सैद (शिबीर व्यवस्थापक) हीलिंग हॅन्डस फाऊंडेशन, पुणे
मोबाईल : 7774046853 यांच्याशी संपर्क साधता येईल असे आवाहन यावेळी करण्यात आले. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन सरचिटणीस रामदास वाडेकर यांच्या संकल्पनेतून हे शिबीर घेण्यात घेण्यात आले.सौरभ सावंत,नितीन जाधव, मंजू ढेरंगे,स्वाती सोनकुसरे,पोपट अरगडे,महावीर पाटील,शशिकांत धनगे,राजेंद्र लावरे,दत्तात्रय जाधव,संजय देशमुख,विराज सावंत,सुनिल चौधरी,निर्मला नाईक,हेमा वराडे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे



