मावळमित्र न्यूज विशेष:
सातत्यपूर्ण कामाच्या जोरावर राजकीय पटलावर आपले कर्तृत्व सिद्ध करणारे सत्यजित तांबे राज्याच्या तरूणांचे आयडाॅल आहे. कष्ट,प्रामाणिकपणा,सुस्वभावासह राजकारणातली सर्व गुणांची जपवणूक करावीच लागते. नुस्त्या या गुणांची जपवणूक करूनही  चालत नाही. ते गुण आत्मसात करून त्यात सातत्य असावे लागते.
फार कमी वयात काॅग्रेस विचारांचा जनाधार असलेला लोकप्रिय युवा नेता अशी ओळख सत्यजित दादांना मिळाली. स्व कर्तृत्वाने राजकारणात त्यांनी आपला दबदबा केला. आम्हा तरूण पिढीच्या कार्यकर्त्याची त्यांच्यावर फार मर्जी असलेल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.
सत्यजित तांबे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यावर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. काँग्रेसचे नेते राहूलजी  गांधी यांचे निकटवर्तीय अशी त्यांची छबी तर आम्हा तरूणांना खूपच भावते. राजकारणाचे बाळकडू पाठीशी असलेल्या या तरूण नेतृत्वाला समाजाने जपलं पाहिजे.
आम्हा तरूणांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे दादांची काळजी घेतली पाहिजे.नेतृत्व उभ रहायला वेळ लागतो. पण एकदा का  नेतृत्व उभं राहिलेलं की त्या नेतृत्वाच्या दूरदृष्टीने महाराष्ट्र घडतो,बहरतो,समृद्ध होतो हा आपला इतिहास आहे.या इतिहासाला साक्षी मानून आमची जबाबदारी आहे आमच्या नेतृत्वाला जपण्याची,ते काम आम्ही सगळे काॅग्रेस जण निष्ठेने करतो हे सांगितले पाहिजे,किंबहुना हा विश्वास आज व्यक्त करताना मन अभिमानाने भरून येते.
सत्यजित दादा,यांना मोठा राजकीय वारसा आणि वसा आहे. हा वसा सामाजिक जाणिवेतून पुढे आला आहे. हा वसा पिढ्यानुपिढ्या चालत आहे.संगमनेर तालुक्यातील डाॅ.सुधीर तांबे हे मोठे नाव, १५ वर्ष डॉक्टर म्हणून जनतेची सेवा केल्यावर सुधीर सक्रीय राजकारणात प्रवेश केला. काँग्रेस विचाराला शिरवंद्य मानून धर्मनिरपेक्ष विचारांची त्यांनी कास धरली.
पुढे शहराचे नगराध्यक्ष झाले,अनेक वर्ष नगराध्यक्ष झाल्यावर पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेत गेले. विधानपरिषदेत प्रतिनिधित्व केलेल्या सुधीर तांबे साहेब यांच्या विचारांचा वारसा पुढच्या पिढीने जपला.सत्यजित यांची  आई दुर्गाताई सुधीर तांबे या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी. त्याही नगराध्यक्ष झाल्या.आई वडील शहराचे नगराध्यक्ष त्या मुळे शहराच्या सर्वागीण विकासाच्या कार्यशाळेचे धडे रोज घरातच सत्यजित यांनी गिरवले. सत्यजित यांचे उच्च शिक्षण विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात झाले.
शिक्षण घेत असतानाच ते विद्यार्थी काँग्रेसचे काम करायचे.
प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस ही जबाबदारी त्यांनी घेतली.
दहा वर्षे जिल्हा परिषदेत काम केले. दोन  वेळा जिल्हा परिषदेत निवडून आले. प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदावर त्यांनी काम केले. युवक काँग्रेसच्या निवडणुकीत मोठे मताधिक्य घेऊन ते निवडून आले आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. जयहिंद युवा मंचच्या पुढाकारातून सत्यजित दादा यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. ज्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला कायमच होत गेला.
दादाचा आणि माझा परिचय हा युवक काॅग्रेस संघटनेत काम  करत असताना आला.सर्वसामान्य कार्यकत्या बद्दल  आपलेपणा. त्यांची  प्रेमाने जवळीव  साधण्याची कला,आपुलकीचे बोलणे या गुणांचा माझ्यावर प्रभाव पडला आणि सत्यजित तांबे यांचा फॅन झालो. वडिलांच्या पावलावर पाऊले ठेवून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या विचारांचा वारसा दुर्गाताई आणि सत्यजितजी करीत असलेल्या कामाचा त्यांचे सहकारी म्हणून आम्हाला आदर आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले दादा,सर्वाच्या सुखदु:खात सहभागी होत आहेत. सर्वसामन्याच्या गळ्यातील ते ताईत झाले आहेत.त्यांच्या कामाची पद्धतही खुप वेगळी आहे काम होणारे असेल तर लगेच ते स्वतःच पाठपुरावा करतात, खुप आगळे-वेगळे हे नेते आहे. सर्वसामन्यातील कार्यकत्याचे ते भविष्यातील महाराष्ट्र राज्याचे कॉग्रेस पक्षाने मंत्री असणार हे निश्चित ऐवढयाच शुभेच्छा आजच्या वाढदिवसानिमित्त सत्यजित दादांना देऊन शब्दांना पूर्णविराम देतो.
(गणेश वसंतराव काजळे,माजी अध्यक्ष मावळ तालुका युवक काँग्रेस).

error: Content is protected !!