मावळ पंचायत समितीच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने अंकुश येवले व  रोहिदास लामगन सन्मानित
पवनानगर:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवलेवाडी (शिवली) येथील उपशिक व कडधे केंद्राचे केंद्रप्रमुख अंकुश येवले व मुख्याध्यापक रोहिदास लामगन  यांना मावळ पंचायत समितीच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
मावळचे आमदार सुनील शेळके,पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड ,गटविकास अधिकारी सुधीर भागवत ,गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांच्या हस्ते येवले यांना  हा पुरस्कार देण्यात आला .
येवलेवाडी ही जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा अतिदुर्गम भागात असून सन २००३  मध्ये शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वस्ती शाळा सुरू करण्यात आली होती.
  सुरुवातीला एका छोट्याशा मंदिरात भरणाऱ्या या शाळेचे हळूहळू वटवृक्षात रूपांतर झाले . विद्यार्थ्यांना आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू लागल्याने या ठिकाणचा पट  हळूहळू वाढू लागला. सन २००९ मध्ये या शाळेचे रूपांतर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाले. व या शाळेचे शिक्षक अंकुश येवले व मुख्याध्यापक रोहिदास लामगन व ग्रामस्थ यांच्या अथक परिश्रमातून शाळेला सुसज्जा अशी इमारत उभारण्यात आली.
   या शाळेतील मुख्याध्यापक लामगन सर व शिक्षक येवले सर शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना घडवत असताना व ज्ञानदानाचे काम करत असताना अनेक नवो उपक्रम शाळा पातळीवर राबवत असतात, त्यामुळे शाळेची गुणवत्ता व विद्यार्थ्यांची बौद्धिक विकास होण्यास मदत होते. सध्या शाळेमध्ये तारखेनुसार पाढा, सुंदर हस्ताक्षर इंग्रजी वाचन लेखन असे अनेक उपक्रम अनेक उपक्रम राबवत असल्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता उत्कृष्ट असल्याचे दिसून येते .
   पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर येवले म्हणाले ,की गेल्या १९  वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले. शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे उत्तम कार्य केले.आदिवासी तांडे पांडे व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात विद्यार्थ्यांना ज्ञान दानाचे काम करत असल्याचे समाधान आहे.
   येवले यांनी  विद्यार्थ्या बरोबर वस्ती शाळा शिक्षकांचे प्रश्न राज्यस्तरावर सोडवण्यासाठी आमदार कपिल पाटील व राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड,महिला अध्यक्ष स्वाती बेंडभर, उपाध्यक्ष बबन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारण्यासाठी अथक प्रयत्न केले  त्यामुळे सात वर्ष तालुका अध्यक्ष पाच वर्षे जिल्हाध्यक्ष पद व सध्या पुणे जिल्हा विभागीय कार्याध्यक्षपदावर कार्य करत आहे .त्यामुळे राज्यातील 8765 वस्ती शाळा शिक्षकांना सेवेत आणण्यासाठी अथक प्रयत्न केले व आंदोलने केली .
   आणि यश प्राप्त  झाल्याचे मला समाधान असल्याचे त्यांनी व्यक्त केली .तसेच हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझे  मुख्याध्यापक लामगण सर ,पालक विद्यार्थी ग्रामस्थ व माझ्या आई-वडिलांचा सहभाग आहे असे ते म्हणाले.

error: Content is protected !!