वडगाव मावळ :
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित पवना विद्या मंदिर,पवननगर येथील शाळेतील अध्यापक भारत काळे यांना तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले
वडगाव येथील भेगडे लॉन्स येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती मावळ व मावळ विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना गौरविण्यात  आले.
  मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके  व  पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या शुभहस्ते भारत काळे यांना गौरविण्यात आले
यावेळी शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत, मावळचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे,माजी सभापती ज्योती शिंदे, निकीता घोटकुले, सुवर्णा कुंभार, पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदु धनवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष दिपक हुलावळे,विस्तार अधिकारी सुदाम वाळुंज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
भारत काळे पवनमावळातील पवना धरणाच्या पायथ्याशी वसलेल्या ब्राम्हणोली गावातील शेतकरी कुटुंबातील आहेत. सन २००७ साली आपली कर्मभूमी व जन्मभूमी असलेल्या पवनानगर येथील पवना विद्या मंदिर या शाळेतून नोकरीची सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे माध्यामातून अनेक शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न, तालुक्यातील विविध गुणवंत विद्यार्थी यांना मार्गदर्शन तसेच ग्रामीण दुर्गम भागतील शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवून त्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तसेच शाळेसाठी विविध दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न,माजी विद्यार्थी स्नेह मेळावे आयोजित करून शाळेसाठी व गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचे आवाहन करण्यात यश तसेच सहकार क्षेत्रात नूतन महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष, यशवंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था साते येथे कार्यकारी संचालक आणि मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष पदाची जबाबदारी घेऊन पत्रकार क्षेत्रात काम करताना ग्रामीण भागातील समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देणे  याचीच दखल घेऊन महाराष्ट्र शिक्षक पॅनेलच्या वतीने राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्काराने सन्मान करण्यात आला अशा विविध सामाजिक व सहकार क्षेत्रातील कामगिरी बरोबर शैक्षणिक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने पंचायत समिती मावळ तालुक्याच्या तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
पुरस्कार मिळाल्यानंतर काळे म्हणाले की, गेल्या १५ वर्षापेक्षा जास्त काळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करत आहे यासाठी आमच्या नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळातील सर्व पदाधिकारी व शाळेतील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि सहकारी शिक्षक यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने माझे काम सुरु आहे यापुढील काळातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी माझ्या क्षमतेप्रमाणे योगदान देण्यात येईल.

error: Content is protected !!