तळेगाव स्टेशन:
रूडसेट संस्था ही खूप ग्रामीण भागामध्ये युवक युवती व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे मोफत काम करत असते अशा संस्थेमध्ये मी पोल्ट्री या व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण घेतले,  याचा मला नक्कीच लाभ होईल असा विश्वास यश नवघणे या प्रशिक्षणार्थीनी व्यक्त केला.
रूडसेट संस्थेच्या वतीने सुमारे पस्तीस विद्यार्थांना ‘पोल्ट्री व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर यश आणि इतर प्रशिक्षणार्थी आपले अनुभव सांगत होते.
   यश पुढे  सांगत होता,” आतापर्यंत मोफत शिक्षण आणि तेही व्यवसायाचे ही संकल्पना माझ्यासाठी खूप नवीन होती मला काहीतरी करायचे होते व घरी सुद्धा काहीतरी शेती पूरक कर म्हणून मागे लागले होते म्हणून याला ऍडमिशन घेतलं. 
ऍडमिशन घेतल्यानंतर वर्ग चालू झाले आणि प्रशिक्षणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली प्रशिक्षणामध्ये पहिल्याच दिवशी जो आत्मविश्वास आणि आपण जे ध्येय निश्चित केले आहे हे साथ देऊ शकतो हा आत्मविश्वास पहिल्या दिवसाच्या एकंदर शिकवण्यातून आला. या पहिल्या दिवसांमध्ये संस्थेच्या वतीने संस्थेचे संचालक प्रवीण बनकर व प्रशिक्षक हरीश यांनी जे मार्गदर्शन केले ते निश्चितच खूप महत्त्वाचे होते की जे याआधी कधीही शिकलो नाही.             
या पोल्ट्री प्रशिक्षणामध्ये पोल्ट्री प्रशिक्षण हे उत्कृष्ट दर्जाचे आणि हायली क्वालिफाईड असतात हे आम्हाला पहिल्यांदाच कळले. आम्हाला शिकवायला येणारे प्रशिक्षक हे पशुसंवर्धन खात्याचे उपायुक्त म्हणून रिटायर झालेले असे डॉक्टर श्री चंद्रकांत अपशिंगे. त्यांच्या ज्ञानाचा आणि त्यांनी दिलेल्या माहितीचा उपयोग हा आम्हाला व्यवसाय करण्यासाठी खूपच मोलाचा आणि एक मार्ग ठरणार आहे.       
  संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये खूप बारीक सारीक गोष्टींचा अभ्यासपूर्वक विचार करून का प्रशिक्षण कार्यक्रमाचा आराखडा तयार केलेला आहे. त्यामध्ये उद्योजकाचा सर्वांगीण विकास व एक आदर्श उद्योजक कसा घडेल याचा सारासार विचार केलेला आहे. या संस्थेचे संस्थापक डॉक्टर डी वीरेंद्र हेग्गडे यांच्या विचारसरणीतून आत्ताच्या घडीला बेरोजगारीवर मात करण्यासाठी जे प्रयत्न केले पाहिजेत त्याचे हे मूर्तीमंत उदाहरण असून या संस्थेतून निश्चितच देशासाठी एक आदर्श उद्योजक घडवण्याचे काम संस्थान नेहमीच करत आहे.

error: Content is protected !!