कोथुर्णे ग्रामपंचायत सरपंच पदी अबोली अतुल सोनवणे यांची निवड
पवनानगर:
कोथुर्णे ग्रामपंचायतच्या सरपंच पदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पुणे जिल्हा युवक आघाडी सरचिटणीस अतुल बाजीराव सोनवणे यांच्या पत्नी सौ अबोली अतुल सोनवणे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
दीड वर्षांपूर्वी मावळ तालुक्याचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी आणि सर्व ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून सदर ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली होती .प्रथम नियुक्त सरपंच प्रमोद ज्ञानेश्वर दळवी यांच्या ठरलेल्या वेळेतील कार्यकाल संपल्यानंतर त्यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला. सरपंच पदाची निवड ग्रामपंचायत कार्यालय कोथुर्णे येथे पार पडली. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून मंडलाधिकारी प्रकाश बलकवडे यांनी काम पाहिले.
ग्रामसेवक शशिकांत तिडके पाटील व गावकामगार तलाठी सुप्रिया कावरे यांनी सहकार्य केले.सरपंच पदासाठी अबोली अतुल सोनवणे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश बलकवडे यांनी अबोली सोनवणे यांची सरपंच पदी निवड झाली याची घोषणा केली.
  यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, माजी सरपंच व  विद्यमान सदस्य प्रमोद ज्ञानेश्वर दळवी, माजी उपसरपंच सचिन दळवी, उपसरपंच रूपाली भीमराव दळवी, सदस्य पल्लवी भगवान फाटक ,ग्रामपंचायत सदस्य जुईली सुरेश दळवी ,माजी सरपंच विद्यमान सदस्य शकुंतला वाघमारे, माजी उपसरपंच एकनाथ दळवी, माजी सदस्य दाजी बाळ सोनवणे ,सिधु दळवी ,हिरामण नढे, माजी सरपंच सदाशिव सुतार ,लक्ष्मण दळवी, माजी उपसरपंच बाळासाहेब मसुरकर, माऊली सोनवणे ,शेखर दळवी, भीमराव दळवी ,भाऊ सोनवणे ,राहुल सोनवणे, संदीप दळवी, सुरेश दळवी, बाळू नढे ,सिधू दळवी ,हिरामण नढे ,सूर्यकांत दळवी, नवनाथ दळवी ,कैलास सोनवणे, गौतम सोनवणे ,महेंद्र सोनवणे ,नंदू सोनवणे, दत्तू सोनवणे ,शरद सोनवणे ,मोहन सोनवणे, गणेश गायकवाड ,संदीप सोनवणे, सचिन सोनवणे व  ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
सरपंच पदाची घोषणा झाल्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रामदैवता ची पूजा करून नवनियुक्त सरपंच अबोली अतुल सोनवणे आणि सर्व सदस्य यांची ढोल ताशाच्या गजरामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकिमध्ये गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते. गावातील महिलांनी सरपंच यांना ओवाळूण औक्षण केले.
मिरवणूक कार्यक्रमानंतर नवनियुक्त सरपंच यांचा सत्कार व शुभेच्छा कार्यक्रम तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले) नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी रिपब्लिक पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव आरपीआय युवक आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष समीर अण्णा जाधव महिला आघाडी अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र सदस्य यमुनाताई साळवे भावनाताई ओव्हाळ पुणे जिल्हा संघटक धर्मरक्षित जाधव माऊली सोनवणे उषा जाधव पवन मावळ अध्यक्ष दादासाहेब वाघमारे प्रफुल्ल भालेसैन अशोक गायकवाड अशोक सरवते संतोष कदम अरविंद रोकडे तसेच मावळ तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील सर्व ग्रामस्थ नातेवाईक मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
समता मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला भाऊ सोनवणे संदीप सोनवणे शरद सोनवणे मोहन सोनवणे गणेश गायकवाड सचिन सोनवणे महेंद्र सोनवणे नंदू सोनवणे बाळू सोनवणे सुधीर सोनवणे सोपान सोनवणे प्रमुख सोनवणे मिलिंद सोनवणे सुमित सोनवणे अविनाश गायकवाड गणेश गायकवाड संतोष सोनवणे  अशोक सोनवणे यांच्या हस्ते मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकल्प इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांनी तर प्रास्ताविक पुणे जिल्हा युवक आघाडी सरचिटणीस अतुल सोनवणे यांनी केले आभार पवन मावळ युवक आघाडी संपर्कप्रमुख शरद सोनवणे यांनी मानले.

error: Content is protected !!