निगडे:
पोषण आहार अभियानांतर्गत निगडे तील अंगणवाडीमध्ये पौष्टिक आहार कार्यक्रम घेण्यात आला .यावेळी अंगणवाडी मधील मुलांच्या सर्व पालकांनी वेगवेगळे पदार्थ बनवून आणले. त्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन कॅल्शियम असणारे पदार्थ होते. त्यातून परिपूर्ण असा पदार्थ असलेल्या मध्ये  तीन नंबर काढण्यात आले.
पहिला नंबर माया पानसरे व राजश्री खेंगले दुसरा नंबर पूजा भागवत व तिसरा नंबर उर्मिला भांगरे यांचा काढण्यात आला. यावेळी सर्व पालकांनी पौष्टिक पदार्थ आपल्या मुलांना खाऊ घालावे व त्यांना चांगल्या प्रकारे सुदृढ व निरोगी ठेवावे असे सांगण्यात आले.
  यावेळी  प्रथम लोकनियुक्त   सरपंच सविता भांगरे, उपसरपंच रामदास चव्हाण ,ग्रामपंचायत सदस्य पूजा भागवत, सीताराम ठाकर, ग्रामसेवक शशिकिरण जाधव ,अंगणवाडीच्या बीट प्रमुख सुधा देसले, अंगणवाडी सेविका लताबाई शेलार, सुनिता शेलार, पद्मा भागवत ,सुदेशना पाटारे, रूक्मिणी भांगरे व पालक वर्ग उपस्थित होते.

error: Content is protected !!