कासारसाई :
  बिबट्याने कासारसाई येथील  बंगल्या बाहेरील पाळीव कुत्र्याच्या पिल्लाला उचलून नेहल्याने  गावक-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 
स्थानिरहिवाशी ी सचिन गायकवाड म्हणाले, ”भगवंत लॉन्सजवळ बिबट्या दिसला होता. त्याने एक पाळीव कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन गेल्याचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमधून दिसत आहे. त्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण आहे.
शेतकरी व कामगार शेतामध्ये सकाळी सात  आठ  वाजेच्या नंतर पूर्ण सूर्यप्रकाश दिसत असल्यावरच कामासाठी जातात. तसेच, ते शेतातून दिवस मावळण्यापूर्वी घरी जातात. रात्रीचे पिकांना पाणी द्यायला जाणे बंद केले आहे.
हनुमंत जाधव (वन अधिकारी, वडगाव मावळ) म्हणाले, ”त्यांनी वनविभागाच्या  कर्मचाऱ्यांसोबत गावामध्ये पाहणी केली. बिबट्याचे ठसे आढळल्यामुळे बिबट्याचे हल्ले होऊ नयेत, या संदर्भात काळजी घेण्यासाठी जनजागृती केली आहे. लोकांना सांगण्यात आले आहे, की त्यांनी एकट्याने रात्री फिरू नये.
तीन चारजण एकत्र फिरावे व सोबत काठी ठेवावी, टॉर्च ठेवावा व मोबाईल फोनवर मोठ्या आवाजात गाणे लावावीत. यामुळे बिबट्या जवळ येणार नाही. पाळीव प्राणी जसे गाय, म्हैस, बैल, बकऱ्या या बंदिस्त गोठ्यात ठेवाव्यात.

error: Content is protected !!