निगडे:
ठाकरवाडी निगडे व कुरणवस्ती निगडे शाळेस ग्रामपंचायत निगडे कडून सौर ऊर्जा संच भेट देण्यात आला.
निगडे ग्रामपंचायत मार्फत आज  गावातील ठाकरवाडी तसेच कुरणवस्ती शाळेला सौर ऊर्जा संच बसवून देण्यात आले आहेत. यामुळे शाळांना येणाऱ्या महिन्याच्या वीजबिलापासून सुटका होणार आहे.
शिवाय सतत होणाऱ्या अखंडित वीजपुरवठ्यामुळे डिजिटल वर्गाच्या कामात अडथळा येणे आता या संचामुळे बंद होणार आहे. शाळेमध्ये डिजिटल तसेच ई लर्निग ची साधने  कार्यरत आहेत. येथे ऑनलाइन व व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना  शिकवण्यात येते. भारनियमन व वीजपुरवठा खंडित होत असल्याने शिकवताना समस्या निर्माण होत होती.
ती आता दूर होणार आहे.
विजेबाबत शाळा आता स्वावलंबी बनल्या असून आता भारनियमनाच्या समस्येपासून सुटकाही मिळाली असे मत यावेळी गावाच्या कार्यशील सरपंच सौ सविता भांगरे यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी गावचे उपसरपंच रामदास चव्हाण, सदस्य सिताराम ठाकर, पूजा भागवत, मनीषा ठाकर तसेच माजी सरपंच सोपान ठाकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकांत ठाकर, पालक बाळू ठाकर, सविता ठाकर लताबाई शेलार, सुनिता शेलार, रुक्मिणी भांगरे गावचे ग्रामसेवक जाधव भाऊसाहेब, जयश्री चांदबोधले, सुधा देसले ,पद्मा भागवत ,सुदेशना पाटारे आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.  सूत्रसंचालन रेखा केकान यांनी केले तर सर्वांचे आभार श्रीनिवास शिंदे यांनी मानले.

error: Content is protected !!