कामशेत:
पंतप्रघान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे, सुशांत शिंदे यांनी “एक भारत श्रेष्ठ भारत व MPSC,UPSC स्पर्धा परिक्षा संबधित विशेष मार्गदर्शन केले.
प्रधानमंत्री नरेंद्र  मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विठ्ठल तुर्डे यांच्या वतीने सेवा पंधरवडा निमित्ताने “एक भारत श्रेष्ठ भारत” या आभियाना अंतर्गत मा. राज्यमंत्री  बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप  काकडे ,महिला अध्यक्ष सायली बोत्रे,सेवा अभियान संयोजक गणेश ठाकर,विद्यार्थी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत शहरातीत महर्षी कर्वे आश्रम शाळेत हे मार्गदर्शन शिबीर झाले.
मावळ कन्या उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे तसेच उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे (परभणी)यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना एक भारत श्रेष्ठ भारत व MPSC,UPSC स्पर्धा परिक्षा संबधित विशेष मार्गदर्शन केले.
यावेळी भाजपा नेते संतोष कुंभार,किसन दाभाडे, सोशल मिडीया अध्यक्ष सागर शिंदे, दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे,धनगर परिषद अध्यक्ष नामदेव शेडगे कामशेत शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण शिंदे,बबलु सुर्वे,अभिषेक भांगरे आदी शाळेतील शिक्षक वर्ग ,विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्राचार्य देवरे यांनी  आभार मानले.

error: Content is protected !!