वडगाव मावळ:
खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर संघ यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक सोहळ्यामध्ये श्री रमेश कुमार सहानी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वडगाव मावळ चे शिक्षक आदिनाथ दगडु आगळमे यांना ‘पुणे जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
  या सोहळ्याला खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील तसेच खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी , मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे प्रमुख राजेश.गायकवाड  तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते .
  श्री.रमेश कुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड जूनियर कॉलेज वडगाव मावळचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बाळासाहेब म्हाळसकर, उपाध्यक्ष सचिन नारायण ढोरे ,सचिव नंदकुमार ढोरे ,मुख्याध्यापक टी एन साई लक्ष्मी यांनी आगळमे यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!