वडगाव मावळ:
आंदर मावळ भागातील सुमारे ५०-५५ गावे,वाड्या-वस्त्यांना मुख्य महामार्गाला जोडणाऱ्या तसेच औद्योगिक वसाहतींना दळणवळणासाठी उपलब्ध कान्हे फाटा येथील एकमेव मुख्य रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांमुळे दररोज आपल्या उपजिवीकेसाठी ये-जा करणाऱ्या कामगार, दूध-भाजी तसेच अन्य अत्यावश्यक व्यवसायानिमित्त ये-जा करणारे नागरिक तसेच शिक्षणासाठी ये-जा करणारे विद्यार्थी-विद्यार्थीनी व नियमीत प्रवास करणाऱ्या प्रवासी नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
पावसाचे वातावरण असल्याने आंदर मावळ भागातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी देखील वाढलेली दिसत आहे.
अन्य पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे या मार्गावर वाहतुकीची वर्दळ वाढली असून अपघाताचा धोका व प्रमाण वाढले आहे.
PWD, PMRDA सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधीत  प्रशासनाने योग्य ती कारवाई करुन त्वरीत उपाययोजना करावी व नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी कान्हेचे सरपंच विजय सातकर, जांभूळचे माजी सरपंच संतोष जांभूळकर, तळेगावचे उद्योजक तुषार भेगडे, ग्रामपंचायत सदस्य समीर सातकर, आमदार सुनिल आण्णा शेळके युवा मंचचे सुजित सातकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका माजी उपाध्यक्ष किशोर अशोक सातकर, मित्तल चोपडे, तुषार सातकर, संदेश सातकर व कान्हे ग्रामस्थांनी केली.

error: Content is protected !!