फायनल सम्राट पावरचा दशक्रिया विधी :वेहरगाव च्या गायकवाड परिवाराचा पावर हरपला
वेहरगाव:
बैलगाडा शर्यत महाराष्ट्राची शान,कित्येक कुटूबांची ओळख या सर्जाराजाने वाढवली आणि जपली. गोठ्यातील या मुक्या प्राण्याला पोटच्या लेकरा प्रमाणे बैलगाडा मालक  आणि मालकीण संभाळत असल्याचे आपण पाहतो. शर्यतीच्या बैलांचा खुराक आणि देखभालाची बडेजाव मोठा असतो हेही वेगळे सांगण्याची गरज नाही.
शर्यतीची बैलजोडी मालकाच्या नावासाठी आणि प्रतिष्ठेसाठी जीवाचे रान करून धावत असते. आणि धावणा-या या वृषभ राजाच्या पाठीवर कधी चाबकाचे फटके बसतात तर कधी प्रेमाने हळुवार हात फिरवला जातो.अशाच बैलगाडा शर्यतीतील हुकमाचा एक्का, पावर वेहरगाव च्या गायकवाड परिवाराचा लाडका,बादशाह.
तुफान वेगाचा बादशहा अशी ओळख असलेल्या पावरचे दहा दिवसापूर्वी निधन झाले.२१ वर्षे आयुष्य लाभलेला हा शर्यतीचा बादशाह परलोकी गेला आणि गायकवाड परिवाराच्या डोळया समोर गतकाळ तरळून गेला. पावरच्या प्रेमापोटी गायकवाड परिवाराने त्याचा दशक्रिया विधी रविवारी (दि. १८ )ला सकाळी ८.३०  वाजता वेहेरगाव येथे दशक्रियेचे आयोजन केले आहे. त्या निमित्त मावळभूषण हभप तुषार महाराज दळवी यांच्या प्रवचन होणार असल्याची माहिती पावर चे मालक व प्रसिद्ध बैलगाडा मालक सुरेश हुकाजी गायकवाड यांनी दिली.
पावर ने पुणे जिल्ह्यातील सेकंद वर होणाऱ्या छकडी शर्यत स्पर्धेत, सातारा सांगली मध्ये होणाऱ्या मैदान पद्धत शर्यतीमध्ये व बिनजोड शर्यत पद्धतीमध्ये धावण्याच्या जोरावर आपलं व आपल्या मालकाच नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजवल आहे. पावर ने पुणे जिल्ह्यात प्रथमच डिजिटल घड्याळावर होणाऱ्या स्पर्धेत प्रथम फायनल, प्रथमच दोरा टच घड्याळावर होणाऱ्या स्पर्धेत प्रथम फायनल घेवून आणि सेकंद वर होणाऱ्या बैलगाडी शर्यतीमध्ये सर्वाधिक प्रथम क्रमांकाच्या फायनलिंचा विक्रम केला.
बलाढ्य शरीरयष्टी असणाऱ्या पावर ने शर्यतीमध्ये धाव घेऊन बैलगाडा शैकिनांच्या मनावर अधिराज्य गाजवले. अशा ह्या आपल्या कारकिर्दी मध्ये अनेक विक्रम करणाऱ्या वेगाच्या बादशहाचे नुकतेच निधन झाले. बुलेट, गदा, ढाली, घोडा, फ्रिज, टिव्ही ट्रॉफ्या अशी अनेक बक्षिसे त्याने मिळवली.
जेवढ्या शर्यती चुरशीच्या झाल्या त्या सर्व स्पर्धामध्ये पावर ने एक नंबर फायनल मारल्या आहेत. अशा या पावर च्या निधनाने सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!