तळेगाव दाभाडे:
संसदरत्न खासदार सुप्रिय सुळे यांच्या संकल्पेतून  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान संचलित महिला सहाय्य केंद्र, कायदेशीर मार्गदर्शन, समुपदेशन ,मदत केंद्राचे उद्घाटन सारीका सुनिल शेळके यांच्या हस्ते झाले. आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र काम करणार आहे.
कौटुंबिक समस्या , समुपदेशन, कायदेशीर मदत व मार्गदर्शन या केंद्रातून केले जाणार आहे. खासदर सुप्रिया सुळे यांनी यावेळी ऑनलाइन मार्गदर्शन केले.अन्याय, अत्याचारग्रस्त महिलांना या केंद्राद्वारे कशी मदत करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
महिलांना विनामूल्य  कशी कायदेशरमदत  देता येईल याबाबत मार्गदर्शन ही करण्यात आले.  मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा  दिपाली गराडे, लीगल सेलचे अध्यक्ष सोमनाथ पवळे,अ‍ॅड. अक्षय रौंधळ,मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष ज्योती वैरागर, महिला ग्रामीण ब्लाॅक अध्यक्षा पुष्पा घोजगे  उपस्थित होते.

error: Content is protected !!