वडगाव मावळ:
मावळ तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने  मावळातील चार धरणे १००  टक्के भरली आहेत. तर उर्वरित धरणे शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. मागील दोन दिवसांपासून लोणावळा व मावळ तालुक्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरण १००  टक्के भरले.
असून धरणातून ५६००  क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
कासारसाई हे धरण देखील १००  टक्के भरले आहे. नाणे व आंदर मावळाला पाणी पुरवठा करणारे वडिवळे व आंद्रा ही धरणे देखील १०० टक्के भरली आहेत. लोणावळा शहर व ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाटा कंपनीच्या वलवण धरणात ८३.४६ टक्के पाणीसाठा झाला आहे.  ठोकळवाडी धरण ९२.५९  टक्के, शिरोता धरण ८०.७८ टक्के भरले आहे.
लोणावळा धरणात ४६.५० टक्के साठा उपलब्ध आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पवना व आंद्रा धरणातून पाण्याचा  विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे.तर ओढे नाले दुथडी भरून वाहत असून रस्त्यावर पाणी आहे. धुव्वाधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून वीज पुरवठा खंडित होत आहे.

error: Content is protected !!