कामशेत:
वाढदिवसाचे औचित्य साधून कामशेत येथील तरूणाने पंडीत नेहरू विद्यालयाला अकरा हजार रुपयांची देणगी दिली.या देणगीतून प्रयोगशाळेत साहित्य घेतले जाणार आहे. ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेतील विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा या हेतूने ही मदत करण्यात आली.
दोस्ती ग्रुपचे संकेत सोनवणे आणि ज्यांचा वाढदिवस होता ते हर्षद दौंडे यांनी दोस्ती ग्रुप च्या माध्यमातून आणि हर्षदच्या वाढदिवसाचे अवचित्य  साधुन पंडित नेहरू विद्यालयातील प्रयोग शाळेसाठी अकरा हजार रुपये देणगी  प्राचार्य श्री धावडे सरांकडे सुपूर्द केली.
हर्षदच्या वाढदिवसा निमीत्ताने विविध राबवण्यात आले. रूग्णांना फळे वाटण्यात आली. गरजु लोकांना ब्लेंकेट वाटण्यात आली. ग्रुप च्या माध्यमातून दोस्ती समुहाचे एक शेअर मार्केटिंगच्या ऑफिसचे उद्घाटन  शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा व  माजी  उपसरपंच डाॅ. विकेश मुथा,शिवसेनेचे माजी शहरप्रमुख  गणेश भोकरे ,माजी सरपंच तानाजी वाघवले,माजी सरपंच सारीका घोलप ,शिल्पा  दौंडे ,सचिन शिंदे व दोस्ती ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होते.
 

error: Content is protected !!