वडगाव मावळ:
कान्हे येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामदैवत श्री. भैरवनाथ महाराज सेवाभावी ट्रस्ट चे मुख्य विश्वस्त उत्तमराव ज्ञानेश्वर सातकर(वय ६०) यांचे  मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या  पश्चात त्यांची पत्नी ,दोन मुले, एक मुलगी, सुना,जवाई,नातवंडे असा परिवार आहे.उद्योजक तुषार सातकर व कान्हे गावचे उपसरपंच व कामगार नेते  गिरीष[बाप्पु ] सातकर त्यांचे पुत्र होते. सातकर यांचा दशक्रिया विधी गुरुवार दिनांक २२ सप्टेंबर २०२२ ला  कान्हे येथे होईल.

error: Content is protected !!