वराळे : “शेती पूरक व्यवसाय करताना बँकेचा सहभाग घेतला तर आर्थिक भरभराट होतो” असा विश्वास कॅनरा बँकेच्या सुदुंबरे शाखेच्या व्यवस्थापक  मोनिका मूर्तडक यांनी केले.
तळेगाव दाभाडे येथील रूडसेट संस्था यांच्या वतीने दहा दिवसीय व्यावसायिक पोल्ट्री फार्म या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. या कार्यक्रमास तळेगाव दाभाडे येथील कॅनरा बँकेचे ग्रामीण विकास अधिकारी श्री विकास सूर्यवंशी तसेच संस्थेचे संचालक श्री प्रवीण बनकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीपक प्रज्वलाने होऊन संस्थेचे संचालक श्री प्रवीण बनकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश व संस्था करत असलेले विनामूल्य व्यावसायिक प्रशिक्षण देऊन उद्योजक कसा घडेल याविषयी स्वागत पर भाषणात प्रस्तावना केली.
कॅनरा बँक तळेगाव शाखेचे कृषी विकास अधिकारी श्री विकास सूर्यवंशी यांनी बँकेच्या विविध योजना आणि त्यापासून शेतकऱ्यांना होणारी मदत याविषयी सविस्तर सांगून प्रत्येकाने बँकेची एक नाते निर्माण केले तर बँक सदैव आपल्या सोबत राहील हा विश्वास नवीनउद्योजकांमध्ये निर्माण केला.  
या प्रशिक्षण कार्यक्रमास मावळ भागातील नवीन पोल्ट्री उद्योजक जवळजवळ 35या  संख्येने प्रशिक्षणासाठी उपस्थित असून हे प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य असून यामध्ये रहिवास, भोजन व प्रशिक्षण दरम्यान चे साहित्य विनामूल्य दिले जाणार असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालय व स्किल डेव्हलपमेंट यांच्या वतीने प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट, बँकेच्या विविध कर्ज योजना, शासकीय कर्ज योजना, प्रत्यक्ष प्रकल्प प्रात्यक्षिक भेट यासारख्या गोष्टींचे आयोजन संस्थेत मार्फत विनामूल्य केलेले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश बावचे यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप पाटील यांनी केले.

error: Content is protected !!