पिंपरी:
टिपेला गेलेला ढोल ताशांचा गजर..डीजे डाॅल्बीच्या दणदणाटावर फिदा झालेली तरुणाई..कुठे गुलालाची उधळण तर कुठे रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव.. सजवलेल्या रथातून लाडक्या गणरायाला निरोप देताना..गणेश भक्तांचा महासागर ओसांडून वाहत असताना चार वर्षाचा चिमुकला हरवला.
रिव्हर व्ह्यु घाट बिर्ला हॉस्पिटलरोड चिंचवड येथे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता हा लहान मुलगा सैरावैरा फिरताना घाबरलेल्या अवस्थेत संस्कार प्रतिष्ठानचे गणपतीदान घेणारे सेवक रामदास सैंदाणे आणि डॉ निरज पाटील यांना दिसला
  प्रसंगावधान राखुन मुलाला जवळ घेतले तो आई बाबांना शोधत होता .त्याला बरोबर घेऊन संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या आई वडीलांचा शोध घेतला .थोड्याच वेळात त्याचे आई वडील सापडले.चिंचवडगातील श्री गणेश सोनवणे  यांना त्यांचा मुलगा आहे याची खात्री करुन त्या चिमुकल्यास त्यांच्या कुटुंबियांना सुखरुप हवाली केला. चिमुकल्या सह आई वडीलांनी सुटकेचा श्वास सोडला.

error: Content is protected !!