महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पुणे  जिल्हा प्रतिनिधी व अजिवली शाळेतील जेष्ठ अध्यापक गणेश पाटील  यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर
पवनानगर:
मावळ तालुक्यातील  पवनमावळ विभागात असलेल्या आजिवली या दुर्गम भागातील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळा, जवण येथील शिक्षक व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी गणेश पाटील  सर यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक- शिक्षक-शिक्षकेतर संघ  यांकडून दरवर्षी जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार  देण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार गणेश पाटील यांना जाहीर करण्यात आला असून सध्या पाटील सर यांच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन विद्यालयात मागील अनेक वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य करत असलेले गणेश पाटील सर हे परिसरात प्रामाणिक आणि प्रयोगशील शिक्षक म्हणून परिचित आहेत. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना चाकोरीबाहेरील जग दाखवणे आणि नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहित करणे, यासाठी गणेश पाटील सरांना ओळखले जाते.
सन १९९७  यावर्षी शैक्षणिक कार्याची सुरुवात वारजे माळवाडी येथील यशोदीप विद्यालय येथे झाली,त्या नंतर एक वर्ष अनाथाश्रम बालग्राम  भुशीडॅम लोणावळा शिक्षक म्हणून कार्यरत होते
त्यांना जाहीर झालेला पुरस्कार म्हणजे त्यांच्या प्रामाणिक ज्ञानदानाच्या कार्याचा गुणगौरव असून आजवर विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप टाकणाऱ्या शिक्षकाच्या पाठीवरच पडलेली ही कौतूकाची आणि सन्मानाची थाप आहे. ‘गणेश पाटील सर यांना आजवर पंचायत समिती मावळचा गुणवंत शिक्षक पुरस्कार, कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार, रोटरी क्लब लोणावळा आदी पुरस्कार मिळाले आहेत.’ तब्बल २३ वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य करत असलेल्या गणेश पाटील सर यांना मिळत असलेला जिल्हास्तरीय पुरस्कार ही विद्यालयासाठीही गौरवाची बाब आहे.

error: Content is protected !!