वडगाव मावळ:
मावळचे  सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी बेकायदेशीर निर्णय घेत आहेत. त्यांनी या पूर्वी सर्व घेतलेल्या निर्णयांची उच्चस्तरीय चौकशी करून यांच्यावर येत्या दोन दिवसात
योग्य कारवाई करावी अन्यथा गुरुवारी (दि.१५ ) सहाय्यक निबंधक कार्यालयावर मोर्चा काढून कार्यालयाला टाळे ठोकले जातील असा इशारा भारतीय जनता पक्षाने दिला आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी वाभाडे परिषदेत सहाय्यक निबंधक यांंच्या कामाचे वाभाडे काढले.
माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, माजी उपसभापती शांताराम कदम, मावळ तालुका भाजपा सरचिटणीस सुनील चव्हाण, शत्रुघ्न धनवे, माऊली अडकर, वसंत म्हसकर पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
  सहाय्यक निबंधक यांच्या अनागोंदी कारभार मावळ तालुक्यात सुरु असून अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रारी करून देखील त्यांनी त्यांच्या पदाचा गैर वापर केला आहे. विकास संस्था निवडणुकीवेळी बेकायदेशीर निर्णय घेतले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देखील त्यांची रीतसर तक्रार दाखल केलेली असून अद्याप पर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
  भाजपचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे म्हणाले,”
तालुक्यातील विकास संस्थांमधील १४  हजार सभासदांचे सभासदत्व रद्द करतांना सभासदांना म्हणणे मांडण्याचा अधिकार दिला नाही. सेवा विकास संस्थांच्या निवडणुकीत  डिपॉजिट भरलेली पावती उमेदवारांना देण्यात आलेली नाही. संस्था ‘ब’ वर्गात असताना लेखी धमकी देऊन ‘क’ वर्गात समाविष्ठ करण्याचा बेकायदेशीर निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या 3 कार्यकर्त्यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली.विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या कारभारात हस्तक्षेप केला जातो. महिला कर्मचारी यांना अर्वाच्च भाषेत बोलले जाते. अशा एक ना अनेक तक्रारी सुर्यवंशी यांच्यावर आहे. त्यांची चौकशी करून  या मागणी साठी आम्ही मैदानात उतरलो असल्याचे भेगडे यांनी सांगितले.

error: Content is protected !!